*कृष्णानंद परिवारात बाबासाहेब माने पाटील जयंती*_ शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज संचालित कृष्णानंद विद्यामंदीर, पाटीलवस्ती अकलूज येथे मंगळवार दि. १४ मार्च २०२३ रोजी कर्मवीर बाबासाहेब माने पाटील यांची १०९ वी जयंती समारंभ पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. प्रताप संभाजी तोरणे सर,पर्यवेक्षक श्री. दगडे सर, शिक्षक वृंद व बालचमू विद्यार्थी यांनी कर्मवीर बाबासाहेब उर्फ मारुतराव आनंदराव माने पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन केले. प्रशालेची विद्यार्थिनी कु. अनुष्का शिंदे ( इ.७ वी ) हिने आपल्या मनोगतात कर्मवीर बाबासाहेब यांच्याबद्दल काही प्रसंग सांगितले. तसेच शिक्षक मनोगतात सहशिक्षक श्री. दादा ढोले सर यांनी त्यांच्या जीवन कार्याचा आढावा घेत जुन्या आठवणींना उजाळा दिला . व त्यावरून मुलांनी काय आदर्श घ्यावा, बाबासाहेब यांचे गोरगरिबांविषयीचे मत किती उदार होते, ते एक चालते बोलते न्यायालय होते, मुलांविषयी असणारे प्रेम व आपुलकी याबद्दल अतिशय मौलिक असे विचार व्यक्त केले. शेवटी अध्यक्षीय भाषणात श्री. प्रताप तोरणे सर यांनी कर्मवीर बाबासाहेब यांच्याबद्दलच्या आठवणीमध्ये मुलांना खिळवून ठेवले. कार्यक्रमाचे प्रास्तविक व सूत्रसंचलन सहशिक्षक श्री. संतोष अनगळ सर यांनी केले. त्यावेळी ते म्हणाले,” कर्मवीर बाबासाहेब माने पाटील हे माळशिरस तालुक्याचे पहिले पंचायत समिती सभापती होते, तसेच अकलूज गावचे सरपंच असताना वृक्षरोपणाला अनन्य साधारण महत्व दिले त्या कार्याची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली व राज्याचे १ ले पारितोषिक अकलूज ग्रामपंचायतीला मिळवून दिले. तसेच ते मल्लांचे पंचप्राण होते. कुस्ती, देशी खेळ त्यांचे खूप आवडते होते. गरिबांचे कैवारी, दिन दलितांचा नेता म्हणून जगद्गुरू शंकराचार्यांनी त्यांना “कर्मवीर ” ही पदवी बहाल केली. शेवटी कार्यक्रमाचे आभार कु. पठाण मॅडम यांनी मानले.






