` _“जागतिक ग्राहक दिन नाट्यमय प्रसंगानी साजरा“`_ शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज संचलित कृष्णानंद विद्यामंदीर, पाटीलवस्ती ता. माळशिरस येथे बुधवार दि. १५ मार्च, २०२३ रोजी “जागतिक ग्राहक दिन” विद्यार्थ्यांच्या विविध नाट्यमय प्रासंगिक अनुभवातून साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रशालेचे सहशिक्षक श्री. संतोष अनगळ सर यांनी ग्राहक म्हणजे काय? ते सांगून जागतिक ग्राहक संरक्षण कायदा का व कधी ,कुठे, कशासाठी करण्यात आला? याचे स्पष्टीकरण देत ग्राहकांची कर्तव्ये व अधिकार कोणते असतात हे उदाहरणांसह स्पष्ट केले. तसेच प्रशालेची विद्यार्थिनी कु. भक्ती देवकर (इ. ९ वी ) हिने ही जागतिक ग्राहक दिनाचे महत्त्व आपल्या वक्तव्यातून स्पष्ट केले. त्यानंतर प्रशालेच्या विविध इयत्तेमधील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी “जागो ग्राहक जागो” हे विविध प्रसंग नाट्यमय स्वरूपात सादर केले त्यामध्ये १) भाजीवाला विक्रेता व ग्राहक फसवणूक २) औषध विक्रेता व ग्राहक फसवणूक ३) वस्तूचे बिल न घेतल्यामुळे होणारी फसवणूक ४) इलेक्ट्रॉनिक वस्तूंची हमी न देणे ५) दुकानदाराने घरपोच केलेल्या वस्तूमध्ये केलेला अपव्यवहार ६) फेक फोन कॉल मधून होणारी सायबर क्राईम ७) वस्तूवरील अवाजवी किंमत यावरून होणारी फसवणूक अशा विविध नाट्यमय प्रसंगातून “जागो ग्राहक जावो” असा संदेश दिला. शेवटी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. प्रताप तोरणे सर यांनी विविध प्रसंगातील सर्व कलाकारांचे मनापासून कौतुक व अभिनंदन करून अध्यक्षीय मनोगतातून समाजात घडलेले फसवे प्रसंग सांगत तुम्ही फसू नका ,जागरूक रहा असा संदेश दिला व सर्वाना ग्राहक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सर्व उपस्थितांचे आभार सहशिक्षिका सौ. मोरे मॅडम यांनी मानले. अशा प्रकारे “जागतिक ग्राहक संरक्षण दिन” उत्स्फूर्तपणे पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.






