आ. राम सातपुते यांच्या वडिलांची सुनिल बनकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट
अकलूज (प्रतिनिधी )माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते यांचे वडील विठ्ठल सातपुते यांनी सोशल मीडिया प्रमुख व आ. राम सातपुते यांचे विश्वासू सुनिल बनकर यांच्या दहिगाव येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांनी त्यांच्या शेती मध्ये फेरफटका मारून शेतीची पहाणी केली. सुनील बनकर यांचे काम व निष्ठा याचे त्यांनी कौतुक केले.यावेळी सुनिल बनकर यांचे वडील ब्रह्मदेव बनकर व भाऊ सचिन बनकर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.तसेच कुटुंबियांसोबत जेवणाचा आस्वाद घेतला.त्यांच्या यथोचित मानसन्मान व आदरातिथ्याने ते भारावून गेले.






