अकलूज नगरपरिषद कार्यक्षेत्रातील नागरिकांनी थकीत कर भरावा -मुख्याधिकारी दयानंद गोरे
अकलूज (प्रतिनिधी )अकलूज नगरपरिषद चे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी अकलूज नगरपरिषद कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, सर्व नागरिकांनी आपला थकीत घरपट्टी पाणीपट्टी व गाळेभाडे पोटी असणारा कर भरावा. अकलूज नगरपरिषदेने चालू आर्थिक वर्षात मागील थकबाकी पोटी असणाऱ्या थकीत घरपट्टी पाणीपट्टी व गाळा भाडे कर वसूल मोहीम राबवली आहे. थकीत कर असणाऱ्या नागरिकांची नळ कनेक्शन तोडणी, गाळे सील करण्यात येत आहेत. चालू कारवाई मध्ये वॉर्ड क्रमांक 6 मधील 2 नळ कनेक्शन, वॉर्ड क्रमांक 2 मधील 4 नळ कनेक्शन, वॉर्ड क्रमांक 1 मधील 1 नळ कनेक्शन तोडणी करण्यात आली आहे.तसेच रत्नप्रभादेवी शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील 2 गाळे धारकांवर गाळे सील करण्याची कारवाई करण्यात आली आहे.तरी सर्व नागरिकांनी आपला थकीत कर तातडीने भरुन कारवाई टाळावी. तसेच चालू आर्थिक वर्षातील कर दिनांक 31 मार्च 2023 पूर्वी भरून नगरपरिषदेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.







