*ब्राम्हण सेवा संघ व श्री गणपती मंदिर ट्रस्ट,अकलूज नियोजित श्री.गणपती मंदिर सभामंडपाचा भूमीपूजन कार्यक्रम संपन्न*




अकलूज : येथील ब्राम्हण सेवा संघ व श्री.गणपती मंदिर ट्रस्ट नियोजित श्री गणपती मंदिर सभामंडपाचा भूमीपूजन सोहळा महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री मा.विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अकलूजचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील, माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील, प्रसिद्ध ह्रदयरोगतज्ज्ञ डॉ.एम.के.इनामदार उपस्थित होते. अकलूज येथील श्री गणपती मंदिर हे पेशवेकालीन मंदिर असून ते सव्वाशे वर्षांपूर्वीचे प्राचीन आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार हा अकलूजच्या वैभवात भर टाकणारा ठरेल असा विश्वास यावेळी ब्राम्हण सेवा संघाचे अध्यक्ष प्रमोद कुलकर्णी यांनी व्यक्त केला. भूमीपूजनाचे पौरोहित्य ट्रस्टचे कार्याध्यक्ष हरिकाका कुलकर्णी, रमण मुळूजकर व राहूल भागवत यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ट्रस्टचे उपाध्यक्ष शिरीष देशपांडे, सचिव श्रीराम पाटील, सहसचिव निरंजन डांगे, वैशाली कांडलकर, जयेश कुलकर्णी, अवधूत शेकदार, श्रीधर कुलकर्णी यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी काशिनाथ डांगे, जगन्नाथ अनगळ, माधवराव दंडवते, नाना देशपांडे, सुरेश देशपांडे, पिंटूनाना कुलकर्णी,सुप्रिया मुदगल, श्रद्धा जोशी, प्राप्ती कुलकर्णी, वैशाली कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डाॅ. प्रेमनाथ रामदासी सर यांनी केले.






