• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home राजकारण

अखेर आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या प्रयत्नांना यश ; आष्टी तलावासाठी ४० कोटी मंजूर …!!                

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
March 10, 2023
in राजकारण
0
अखेर आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या प्रयत्नांना यश ; आष्टी तलावासाठी ४० कोटी मंजूर …!!                
0
SHARES
27
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अखेर आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या प्रयत्नांना यश ; आष्टी तलावासाठी ४० कोटी मंजूर …!!                 मोहोळ तालुक्यातील आष्टी उपसासिंचन योजना म्हणजे तालुक्यांतील दुष्काळी गावांना हरित क्रांतीचे स्वप्न दाखवणारी योजना. आष्टी हा ब्रिटिशकालीन तलाव. या मोठ्या तलावातील उपसा पाण्याने कित्येक हेक्टर शेत जमिनी ओलिताखाली येऊ शकतात; याच आष्टी तलावासाठी उजनी धरणातील कालवाद्वारे सोडण्यासाठी ०.९० टीएमसी पाणी राखीव आहे. त्या पाण्याचा उपयोग दुष्काळी भागात नंदनवन फुलवन्यासाठी व्हावा याच उदात्त भावनेने भाजप व शिवसेना युती सरकारने १९९६ – १९९७ साली ९ हजार हेक्टर क्षेत्र ओलितखाली आणण्यासाठी आष्टी उपसा सिंचन योजना मंजूर केली. या योजनेमुळे आष्टी तलाव परिसरातील मोहोळ तालुक्यातील ११ गावे व माढा तालुक्यातील ३ गावे अशी एकूण १४ गावे सिंचनाखाली येणार आहेत. मात्र मंजुरीनंतर कित्येक वर्ष या योजनेकडे दुर्लक्ष झाले. चातकासारखी पाण्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यासाठी पुन्हा त्यासाठी २०१४ साल उजाडावे लागले व  त्याचवेळी भाजप शिवसेना युतीचे सरकार आले. त्यावेळी या आष्टी उपसासिंचन योजनेस तत्कालीन मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यानी प्रशासकिय मंजुरी दिली होती. या योजनेचा शुभारंभ तत्कालीन जलसंपदा मंत्री मा. गिरीषजी महाजन यांच्या हस्ते झाला. या योजनेसाठी व कालव्याच्या निर्मितीसाठी २५ कोटी रुपये अधिवेशनात मंजूर करण्यात आले होते.                आष्टी तलाव हा १ टीमसी क्षमतेचा आहे. अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजना व लागवडीखालील क्षेत्र या तलावावर अवलंबून आहेत.खूप वर्षांपासून या तलावाच्या डागडुजीकडे लक्ष दिले नव्हते. त्यामुळे तलावाची अत्यंत दुर्दशा झाली होती. तलावाच्या बंदार्याला भेगा पडल्या होत्या. त्यामूळे तलावाची साठवण क्षमता कमी झाली होती. त्यावेळी मोहोळ तालुक्यातील पेनूर, आष्टी, येवती, खंडाळी, पापरी व रोपळे या गावातील काही शेतकरी व ग्रामस्थ चिंतातुर झाले होते. तेव्हा या भागातील शेतकरी व नेतेमंडळींनी आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांना भेटले व तलावाच्या दुरूस्तीसाठी व अर्धवट राहिलेल्या आष्टी योजना पूर्ण करण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करावेत, ही विनंती केली. आ.रणजितदादांनी सर्व प्रशासकीय माहिती घेऊन नागपूर येथील २०२२ च्या हिवाळी अधिवेशनात रखडलेली आष्टी उपसा सिंचन योजने पूर्ण करण्यासाठी शासन स्तरावरून काय प्रयत्न चालू आहेत ? या संबंधी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नास उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी उत्तर दिले की; कालवाच्या कामासाठी व पाण्याच्या वितरण व्यवस्थासाठी नवीन अंदाजपत्रक व निविदा काढण्याचे काम चालू आहे. विधान परिषदेत फक्त प्रश्नचं उपस्थित केला नाही तर आ. रणजितदादा यांनी जलसंपदामंत्री यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन वारंवार पाठपुरावा  केला. आज अखेर त्या सर्व प्रयत्नांना व पाठपुराव्याला यश येऊन या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मा. उपुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी आष्टी तलावासाठी ४० कोटी रुपये मंजूर केले आहेत. हि बातमी कळताच या परिसरातील लोकांनी आनंदोत्सव साजरा केला व आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व राज्य सरकारचे धन्यवाद मानले. यामुळे मोहोळ तालुक्यातील आष्टी परिसर आता दुष्काळ व पाणी टंचाईच्या जोखडातून बाहेर पडण्यास नक्कीच यशस्वी सुरुवात होईल व इथला बळीराजाच्या शिवारात नक्कीच हरित क्रांती होईल; हा आशावाद आता बळकट झाला आहे. आष्टी परिसर व मोहोळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष सहकार्य केल्याबद्दल मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीसजी व रणजितसिंह मोहिते पाटील साहेब यांचे समस्त आष्टी तलाव परिसरातील १४ गावांच्या जनतेच्या वतीने खूप खूप आभार…!!

श्री. रणजित चवरे, पेनुर ता.मोहोळ.उपाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी,सोलापूर जिल्हा.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

पुणे पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या बैठका                                                     अकलूज, करमाळा व टेंभुर्णी येथे मतदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद
राजकारण

पुणे पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या बैठका अकलूज, करमाळा व टेंभुर्णी येथे मतदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद

October 12, 2026
पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीत कोण मारणार बाजी? महायुतीतील बंडखोरीने वाढवली रंगत!
राजकारण

पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीत कोण मारणार बाजी? महायुतीतील बंडखोरीने वाढवली रंगत!

October 7, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्था आणि गावाला विकास निधीत समान न्याय मिळावा – खासदार धैर्यशील मोहिते-पाटील
राजकारण

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्था आणि गावाला विकास निधीत समान न्याय मिळावा – खासदार धैर्यशील मोहिते-पाटील

June 15, 2026
सोलापूर विधानपरिषद : आकड्यांच्या पलीकडचा संघर्ष
राजकारण

सोलापूर विधानपरिषद : आकड्यांच्या पलीकडचा संघर्ष

June 14, 2026
खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश*  *टेंभुर्णी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग होणार फोर लेन;               केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा*
राजकारण

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश* *टेंभुर्णी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग होणार फोर लेन; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा*

May 15, 2026
लोकनेतृत्वाचा ध्यास: खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील*                                                                         ॥*वारसा कर्तृत्वाचा, विश्वास जनसेवेचा
राजकारण

लोकनेतृत्वाचा ध्यास: खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील* ॥*वारसा कर्तृत्वाचा, विश्वास जनसेवेचा

April 13, 2026
Next Post
अकलूज पोलीस ठाणे चे कर्तव्यदक्ष हवालदार रमेश सुरवसे -पाटील यांचे हृदयविकाराने निधन

अकलूज पोलीस ठाणे चे कर्तव्यदक्ष हवालदार रमेश सुरवसे -पाटील यांचे हृदयविकाराने निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In