*शिवरत्न बीबीए व ग्रीनफिंगर्स महाविद्यालयाची बागेचीवाडी येथे श्रमसंस्कार शिबिर*
अकलूज: शिवरत्न शिक्षण संस्था संचलित शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट व शिवपार्वती सार्वजनिक विकास ट्रस्ट संचलित ग्रीन फिंगर कॉलेज ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ पुरस्कृत राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार शिबिर मौजे बागेची वाडी (ता.. माळशिरस) येथे सुरू झाले. शिबिराचे उद्घाटन सरपंच कृष्णराज माने पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मॅनेजमेंट कॉलेजचे प्राचार्य डॉ. अरविंद कुंभार हे होते. आठवडाभर चालणाऱ्या या शिबिराबद्दल माहिती देऊन दररोजची रूपरेषा आपल्या प्रास्ताविकातून व्यक्त केले. या वेळी सरपंच कृष्णराज माने पाटील, सदस्य रियाज शेख व ग्रामसेवक आलमगीर शेख यांचे यावेळी मार्गदर्शन झाले. त्यांनी शिबिरकाळात विद्यार्थ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. सूत्र संचालन मॅनेजमेंट कॉलेजचे प्राध्यापक भारत साठे यांनी केले व आभार लोंढे यांनी मानले. यावेळी गावातील नागरिक, दोन्ही महाविद्यालयातील शिबिरार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटनानंतर पहिल्या दिवशी सेवा योजनेतील सहभागी शिबिरार्थ्यांनी गावातील शाळा परिसर रस्ते व स्मशानभूमी परिसर स्वच्छता व झाडे लावण्यासाठी खड्डे घेणे इत्यादी उपक्रम राबविले







