*अकलूजच्या मुली नं.१शाळेत महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा.*
अकलूज: जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची आदर्श शाळा नं.१अकलूज ता. माळशिरस जि. सोलापूर येथे महिला दिन विविध उपक्रम व स्पर्धां आयोजित करून साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्व महिलांना गुलाब पुष्प देऊन महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी किरण माने व प्रमुख पाहुण्या म्हणून अमृता सदाफुले व सोनाली स्वामी या उपस्थित होत्या.यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा अमृता सदाफुले यांनी महिलांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याचे महत्त्व विशद केले. उपस्थित महिलांमधून राजनंदिनी साठे, पौर्णिमा कोतमिरे, गौरी चव्हाण, सोनाली स्वामी व विद्यार्थिनी श्रेया धोत्रे यांची समायोचित भाषणे झाली.शाळेतील काही मुली भारत देशातील सुप्रसिद्ध कर्तुत्ववान महिलांच्या वेशभूषेमध्ये आल्या होत्या.जिजाऊ- पामिदा सय्यद, सावित्रीबाई फुले-सृष्टी सदाफुले, माता रमाई-श्रुती सदाफुले, सिंधुताई सपकाळ-अक्षरा गुंजकर, इंदिरा गांधी-वैष्णवी पवार, झाशीची राणी लक्ष्मीबाई-तेजश्री सुतार, किरण बेदी-रितू कोतमिरे, पी. टी.उषा-श्रावणी भोसले, प्रतिभा पाटील-श्रावणी स्वामी, कल्पना चावला-तंजीला काझी, डॉ.आनंदीबाई जोशी-सोयरा चव्हाण.यावेळी घेण्यात आलेल्या उखाणे पाठांतर स्पर्धेत कुमुदिनी जगदाळे यांचा प्रथम क्रमांक आला. पोर्णिमा कोतमिरे यांचा द्वितीय तर गौरी चव्हाण यांचा तृतीय क्रमांक आला. अमृता सदाफुले व माधवी साठे यांचा उत्तेजनार्थ क्रमांक आला.संगीत खुर्ची स्पर्धेत गौरी चव्हाण यांचा प्रथम, पौर्णिमा कोतमीरे यांचा द्वितीय, माधवी साठे यांचा तृतीय तर अमृता सदाफुले यांचा उत्तेजनार्थ क्रमांक आला.विजेत्या स्पर्धकांचा व त्यांच्या पाल्यांचा सत्कार संसार उपयोगी भेटवस्तू, गुलाब पुष्प व पेन देऊन करण्यात आला.मुख्याध्यपक मोहन इंगोले यांनी आपल्या भाषणातून स्त्री शिक्षणाचे,स्त्री स्वातंत्र्याचे व स्त्री सबलीकरणाचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिमा सुरवसे यांनी केले. प्रास्ताविक उज्वला भोसले यांनी व आभार प्रदर्शन कैलास गायकवाड यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्तात्रय धाइंजे, उमेश फलटणकर व संतोष यादव यांचे सहकार्य लाभले.







