शुक्रवार दि. २४ फेब्रुवारी २०२३ रोजी शिवरत्न नॉलेज सिटी शंकरनगर-अकलुज येथे, भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुक्याची डाटा व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळा व बूथ सशक्तीकरण अभियान बैठक संपन्न झाली. यावेळी सोलापुर जिल्हा संघटन सरचिटणीस मा.श्री. धैर्यशील मोहिते पाटील, मन की बात जिल्हा संयोजक श्री संतोषजी मोगले, अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हा अध्यक्ष श्री मुक्तारभाई कोरबू, किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस श्री विजयकुमार बुरकुल, श्री अमरसिंह माने -देशमुख, तसेच माळशिरस तालुका कार्यकारणी, मोर्चा, आघाडीचे पदाधिकारी/सदस्य, सर्व शक्तीकेंद्र अध्यक्ष, बुथ अध्यक्ष उपस्थित होते.डाटा व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये सरल अँप संधर्बातला व्हिडीओ स्क्रीनवर दाखवत, अँप डाऊनलोड करणे, प्रोफाईल अपलोड, व वापराविषयी माहिती व प्रशिक्षण श्री संतोषजी मोगले यांनी दिले. मा श्री धैर्यशील मोहिते पाटील यांनी बूथ सशक्तीकरण अभियानाबाबत शक्तीकेंद्र अध्यक्ष, बूथ अध्यक्ष व पन्ना प्रमुख/सदस्याचे कार्य, जबाबदारी, बूथ व्हाट्सअॅप टीमची भूमिका आणि जबाबदारी या विषयी माहिती व मार्गदर्शन केले.










