कुंभेज पवार वस्ती प्राथमिक शाळा व अंगणवाडी येथे शिवजयंती उत्साहात साजरी. *
*करमाळा प्रतिनिधी:- प्रमोद खराडे.
करमाळा कुंभेज पवार वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी च्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली, कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. झिंजाडे सर यांनी केले, प्रथम शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन ग्रामपंचायत सदस्य मा. श्री. गुरुदास सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यानंतर जिल्हा परिषद शाळेच्या वतीने झिंजाडे सर यांनी आपले मनोगत व शाळेविषयी समस्या पालकां समोर मांडल्या, त्यानंतर अंगणवाडी सेविका सौ. आशा चांदणे यांनी शिवाजी महाराज यांच्या कार्याबद्दल व अंगणवाडी मुलांच्या बाबतीत मार्गदर्शन केले, त्यानंतर श्री. गुरुदास सुर्वे व श्री. नितीन भोसले, यांच्या वतीने मुलांना खाऊ वाटप करण्यात आला, या कार्यक्रमासाठी उपस्थित श्री. गुरुदास सुर्वे, सौदागर सुर्वे, श्री. नितीन भोसले, श्री. भारत पवार, श्री.रामेश्वर पवार, हारुण पठाण, शाळेतील मुख्याध्यापक श्री अमृळे सर, श्री. झिंजाडे सर, अंगणवाडी सेविका सौ आशा चांदणे, सौ. ताई पवार, व वस्तीवरील आनेक ग्रामस्थ व शाळेतील विद्यार्थी यांच्या समवेत हा कार्यक्रम संपन्न झाला.









