*सत्य परेशान कर सकता है लेकीन पराजीत नही- लालासाहेब अडगळे*
अनुसूचीत जाती राखीव मतदार संघ माळशिरस तालुक्यात सद्या चालु घडामोडी मध्ये उत्तम जानकर यांच्या जात चोरीचा विषय पुन्हा पेटलेले आहे. नुकताच एक जन अक्रोश मोर्चा या प्रकरणा विरोधात अनुसूचीत जाती-जमाती बचाव समीती माळशिरस तालुका यांनी काढलेला होता. अनुसूचीत जाती-जमाती बचाव समीती माळशिरस तालुका यांच्या प्रयत्नाला यश प्राप्त होताना दिसत आहे.आज दि. २० फेब्रुवारी मा. सुप्रीम कोर्ट दिल्ली यांची प्रकरण संदर्भात सुनावणी झाली आहे. यामध्ये मा. सुप्रीम कोर्ट दिल्ली यांनी हे प्रकरण पुन्हा मा. उच्च न्यायालय मुंबई येथे वर्ग केलेले आहे. यामुळे उत्तम जानकर यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे. अनुसूचीत जाती राखी मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी जानकर यांनी स्वतःची जात बदलली होती. स्वतःच्या मुलगा जीवन व मुलीगी ज्योती या दोघांनाही अनुसूचीत जाती हिंदु-खाटीक दाखला बनावट कागदपत्राच्या अधारे काढलेले आहेत या दोघांनी जिल्हा जात पडताळणी समीती कडे जातप्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रकरण दाखल केलेले होते. परंतु त्यांचा स्वप्नांचा सुपडासाफ झालेले आहे. आता पुन्हा उच्च न्यायालयात हे प्रकरण चालणार असून लवकरच या प्रकरणाचा निकाल लागणार आहे. असे मत अनुसूचीत जाती-जमाती बचाव समीती माळशिरस तालुका तर्फे लालासाहेब अडगळे यांनी व्यक्त केले






