श्रीमती वंचलाबाई बाबुराव सावंत यांचे वयाच्या 92व्या वर्षी निधन.
अकलूज (प्रतिनिधी )अकलूज येथील स्वातंत्र्य सैनिक कै.बाबुराव नामदेव सावंत यांच्या पत्नी व सदाशिवराव माने विद्यालय अकलूज येथे कार्यरत असलेले हनुमंत बाबुराव सावंत हनुमान तालीम चौक अकलूज यांच्या मातोश्री श्रीमती वंचलाबाई बाबुराव सावंत (वय 92 वर्षे) यांचे 19/02/2023 रोजी दुपारी 12.30 वाजता निधन झाले.त्यांचेवर अकलूज येथील अकलाई स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या तिसऱ्याचा (सावडण्याचा )विधी 21फेब्रुवारी रोजी सकाळी होणार आहे.त्यांचे पश्चात एक मुलगा, सुन, नातु, तीन विवाहित मुली, जावई. असा परिवार आहे.त्या अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.






