आयुष्यमान भारत योजनेसाठी अकलूज परिसरातील 100 टक्के नागरिकांनी नोंदणी करा – शिवतेजसिंह मोहिते पाटील
अकलूज : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वकांक्षी आयुष्यमान भारत योजनेसाठी अकलूज परिसरातील 100 टक्के नागरिकांची नाव नोंदणी करून घेण्याचे आवाहन अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी केले आहे.
अकलूज- माळेवाडी नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या 31 बूथ मधील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आज शिवकीर्ती बंगला येथे शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत आयुष्यमान भारत योजनेसंदर्भात बूथ प्रमुखांना मार्गदर्शन करण्यात येऊन 100 टक्के नागरिकांची नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी बोलताना शिवतेजसिंह म्हणाले, आयुष्यमान भारत ही योजना गोरगरीब नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण आहे. यामध्ये केंद्र सरकार कडून आलेल्या यादीनुसार नोंदणी केल्यानंतर प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराचा विमा मिळणार आहे. सध्या अकलूज मध्ये अकलूज क्रिटिकेअर व कदम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे या योजनेद्वारे मोफत उपचार करण्यात येत असून लवकरच आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हॉस्पिटल ची संख्या वाढविण्यात येणार असल्याचेही शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले. तसेच नाव नोंदणी साठी अकलूज- माळेवाडी परिसरात दहा ठिकाणी कॅम्प लावण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले
या बैठकीत भाजपा माळशिरस तालुका सरचिटणीस सुरज मस्के, शक्ती केंद्रप्रमुख स्वप्निल शहाणे, गणेश भिंगे, रोहित शेटे यांच्यासह 31 बूथ वरील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.






