सोलापूर /प्रतिनिधी भैय्या खिलारे :
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी मा राहुलराज सुर्वे यांची निवड करण्यात आली ही निवड महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष मा अमित राजसाहेब ठाकरे यांनी राजगड कार्यालय मुंबई येथे केली गेल्या 3 फेब्रुवारी ला मा अमितजी ठाकरे यांनी पक्षाचा पुनर्बांधणी करण्यासाठी सोलापूर दौरा केला होता मा राहुलराज सुर्वे यांनी विद्यार्थी सेना माढा तालुकाध्यक्ष पदावर काम केले होते त्यांनी केलेले सामाजिक, शैक्षणिक,समाजातील समस्यावर केलेली आंदोलने कामाचा आहवाल पाहता मा अमितजी ठाकरे यांनी त्यांची निवड विद्यार्थी सेनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी केली या निवडीनंतर मनसे प्रवक्ते मा गजानन काळे राज्य सचिव मा अशिष साबळे,मनसे नेते मा दिलीपबापू धौत्रे राज्य उपाध्यक्ष मा अमर कुलकर्णी जिल्हाध्यक्ष मा प्रशांतजी गिड्डे,जिल्हाध्यक्ष मा विनायक आण्णा महिंद्रकर व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मा राहुलराज सुर्वे यांना शुभेच्छा दिल्या






