*‘शिवरत्न’ मध्ये स.म.शंकरराव मोहिते पाटील यांना अभिवादन*
अकलूज: येथील शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज महाविद्यालयात जिल्ह्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी कै. शंकरराव मोहिते पाटील यांच्या ४४व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. शिवरत्न नाॅलेज सिटी या संकुलातील प्रथम फौंडेशन अभ्यासक्रमाचे केंद्रप्रमुख राहुल मोरे यांच्या हस्ते सहकार महर्षींच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद कुंभार, कार्यालयीन कर्मचारी अमोल खरात, सौ. आशा खंडागळे तसेच प्रथम फौंडेशनचे राहुल जगधाने, महादेव शिंदे, पूनम जगधाने, मनिषा शिंदे, सुरक्षाविभागाचे मुस्ताफा काझी व विद्यार्थी- विद्यार्थ्यिनी उपस्थित राहून कै. शंकरराव मोहिते पाटील यांच्या पवित्र स्मृतीला आदरांजली वाहिली.🌾







