सोलापूर/ प्रतिनिधी भैय्या खिलारे : महमदाबाद (शे) प्रतिनिधी -सिद्धेश्वर प्रशाला तपकीर शेटफळ या शाळेत दिनांक 10 /2 /2023 रोजी आजी- आजोबा दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक श्री माने जे पी होते. सदर कार्यक्रमांमध्ये मुला मुलींचे आजी- आजोबा मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये आजी -आजोबा यांच्या विषयी असणारी आत्मीयता, त्यांच्याविषयी असणारे प्रेम, मुलांनी आपल्या भाषणांमधून व्यक्त केले .शाळेचे मुख्याध्यापक श्री माने जे पी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आजी आजोबा यांच्यातील प्रेम सर्वांना मिळाले पाहिजे यासाठी एकत्रित कुटुंब पद्धती असणे आवश्यक आहे याचे सर्वांनी भान राखणे हे गरजेचे आहे याचे अवलोकन सर्वांनी करावे असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाटील सर यांनी केले तर आभार सौदागर सर यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बारले सर, धंगेकर सर ,गोरे सर ,कांबळे सर ,यांनी परिश्रम घेतले.






