मैत्री प्रतिष्ठान माळशिरस तालुका कार्याध्यक्षपदी श्रीकांत धनवडे यांची निवड..मैत्री प्रतिष्ठानने दिलेल्या जबाबदारीला मी कधी तडा लागू देणार नाही – श्रीकांत धनवडे
मैत्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य माळशिरस तालुका कार्याध्यक्ष पदी मा.श्रीकांत धनवडे यांची निवड करण्यात आली. ही निवड मैत्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष महेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुकाध्यक्ष संजय वाघमोडे यांच्या नेतृत्वात निवड करण्यात आली.मैत्री प्रतिष्ठान प्रबोधन शिक्षण आरोग्य न्याय याचा तुम्हाला काम करत असून त्याच तत्त्वावर मीही काम करेल व मैत्री प्रतिष्ठानने दिलेली जबाबदारीला कधी तडा लागू देणार नाही व मैत्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून जनहिताची कामे करेल असे श्रीकांत धनवडे म्हणाले. यावेळी मैत्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष महेश शिंदे, जिल्हा महिला अध्यक्ष नीताताई सुळे,तालुका उपाध्यक्ष शंकर मस्के, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता सुरेखाताई वसव दत्तात्रय दादा वसव तसेच बहुजन मुक्ती पार्टीचे दुर्गेश काळुंखे राहुल गायकवाड व सर्व सहयोगी मित्र उपस्थित होते.






