*डॉ.श्रध्दा जवंजाळ यांच्या प्रयत्नातून मिळणार गर्भाशयाच्या कॅन्सरची मोफत लस*
संग्रामनगर दि.३ (केदार लोहकरे यांजकडून) सामाजिक पटलावरील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व डॉ.श्रध्दा जवंजाळ यांच्या प्रयत्नातून 9 ते 20 वयोगटातील मुलींना गर्भाशयाच्या कर्करोगाची मोफत लस दिली जाणार असून 9 ते 20 या वयोगटातील मुलींचे पालकांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन डॉ.श्रद्धा जवंजाळ यांनी सहारा इन्स्टिट्युट येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे.
यावेळी डॉ.एम.के. इनामदार,डॉ.सतीश दोशी,डॉ.मानसी देवडीकर,डॉ.राहुल जवंजाळ उपस्थित होते.
यावेळी स्त्रीरोग तज्ञ डॉ.सतीश दोशी म्हणाले की,आपल्या देशात वर्षाला 20 टक्के महिलांना गर्भाशयाचा कॅन्सर होतो.यांपैकी 60 ते 70 टक्के महिलांचा गर्भाशयाच्या कर्करोगामुळे मृत्यु होतो.मुळात हा कर्करोग होवू नये म्हणून डॉ.श्रद्धा जवंजाळ यांनी केलेल्या प्रयत्नामुळे मुलींचे मोफत लसीकरण करण्यात येणार आहे .तरी पालकवर्गानी आपल्या 9 ते 20 वयोगटातील मुलींचे लसीकरण करुन घ्यावे असे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.सतीश दोशी पत्रकार परिषदेत म्हणाले.
*चौकट**
अकलूजच्या कॅन्सर पेटंट ऍड असोसिएशन इंडिया,पिंक रिव्होल्यूशन व अपोलो हॉस्पिटल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने अकलूज येथे मोफत गर्भाशयाचा कॅन्सर होऊ नये म्हणून मोफत लसीकरण आयोजित करण्यात येणार आहे. याची नोंदणी डॉ.श्रध्दा जवंजाळ यांच्या माळेवाडी अकलूज येथील सहारा नर्सिंग इंस्टीट्यूट, सुरु करण्यात आली आहे*. लसीकरणाला महत्त्वाचे स्थान आहे म्हणून लस घेणे महत्त्वाचे आहे.हा कौतुकास्पद उपक्रम डॉ.श्रद्धा जवंजाळ यांनी घेतला आहे.याचा मुलींना चांगला फायदा होईल.ही लस अत्याधुनिक असून त्याचा कोणताही दुष्परिणाम नसल्याचे डॉ.एम.के इनामदार यांनी यावेळी सांगितले . गर्भाशयाच्या कॅन्सरचे अनेक दुष्परिणाम दिसून येतात. परंतु महिला हा रोग लपवून ठेवतात.त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढते आहे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होवू नये म्हणून व्हॅक्सिन उपलब्ध झाले आहे आणि ते मोफत मिळत आहे.स्त्रियांना स्तनाचा व गर्भाशयाचा कॅन्सर होवू शकतो.स्तनाच्या कॅन्सरचे प्रमाण मोठे आहे.त्यावर अद्याप उपाय नाही .पण गर्भाशयाचा कॅन्सर होवू नये म्हणून पहिला डोस,दुसरा एक महिन्यानंतर व तिसरा सहा महिन्यानंतर घ्यावा.18 वर्षाखालील मुलींना पालकांचे संम्मती पत्र आवश्यक असून पालकांनी आपल्या मुलींना ही प्रतिबंधात्मक लस द्यावी असे अकलूज येथील सुप्रसिद्ध स्त्री रोगतज्ज्ञ डॉ.मानसी देवडीकर यांनी सांगितले
.*चौकट*
जास्तीत जास्त 250 हून अधिक मुलींचे लसीकरण करण्यात येणार आहे.सध्या या लसीची 3800 रू.किंमत आहे.त्याचे तीन डोस घ्यावे लागणार आहेत.पहिला डोस घेतल्यानंतर एक महिन्याने दुसरा डोस व सहा महिन्या नंतर डोस दिला जातो. राज्यात साडेतीन लाख महिलांचा समूह तयार करण्यात आला आहे.26 फेब्रवारी रोजी नवी मुंबईत लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात येणार आहे.तर माळशिरस तालुक्यातील 9 ते 20 वयोगटातील मुलींचे मोफत लसीकरण करण्यात येणार आहे.
*डॉ. श्रध्दा जवंजाळ*






