अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अकलूज शाखेतर्फे प्रजासत्ताक दिन भारत माता पूजन वृक्षारोपण व विविध भागात भारत मातेच्या प्रतिमेचे वाटप करून व पूजेचे आवाहन करून उत्साहात साजरा
युवकांमध्ये देशप्रेम निर्माण व्हावे या उद्देशाने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे अकलूज या ठिकाणी भारत माता पूजन हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य श्री सुरज मस्के व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका कार्यवाह श्री प्रदीप कनाळ सर उपस्थित होते त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी भाजपा सांस्कृतिक सेल सहसंयोजक श्री अमित पुंज, श्री स्वप्निल शहाणे, श्री शिवाजीराव घोडके अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जिल्हा सहसंयोजक हितेश पुंज, प्रदेश कार्यकारणी सदस्य वरद बाबर, माळशिरस तालुकाप्रमुख संग्राम चव्हाण, अकलूज शहर मंत्री ओंकार कोळी ,अकलूज आंदोलन प्रमुख सौरभ काटे, इंजिनिअरिंग कॉलेजचे अभावीप चे कॉलेज अध्यक्ष अनिकेत नाळे ,उपाध्यक्ष निखिल कुंभार, शंभूराजे काळे ,शुभम स्वामी ,शुभम धनावडे , सुमंत अंधारे, महादेव बिराजदार, रवींद्र जाधव, सागर देवकाते ,विनोद गवसने इतर सर्व संघ स्वयंसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांचे आभार वृक्ष वाटप करून करण्यात आले कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम ने झाली.







