भंडीशेगांव मध्ये कृषीमित्रांनी राबवला सेंद्रिय किचन गार्डनचा उपक्रम
अकलूज (प्रतिनिधी )घरच्या घरी सेंद्रिय पद्धतीने आणि अगदी कमी खर्चात सेंद्रिय किचन गार्डन’ची संकल्पना भंडीशेगांव मध्ये कृषी मित्रांनी मांडली.सुमारे पावणेचार फूट बाय सव्वासहा फुटांच्या जागेत या गार्डनमधून ११ ते १३ प्रकारच्या भाज्या मिळू शकतात. सव्वा महिन्यात येणारी मेथी आता औषध आणि दारू फवारून तीन आठवड्यांत येते. तीच भाजी स्वतःच्या कुटुंबातही खाल्ली जाते. रासायनिक व अशास्त्रीय औषधांच्या वापरामुळे तयार झालेली भाजी आरोग्यास हानिकारक आहे.रासायनिक कीटकनाशक आणि तणनाशकांचा वापर भाजीपाल्यामध्ये वाढला आहे. पण आता त्यात बदल अपेक्षित आहे. किमान आपल्या कुटुंबासाठी, आरोग्यासाठी काही प्रयत्न व्हावेत, यासाठी ही संकल्पना आहे. मुख्यतः उत्तम आरोग्यासाठी सेंद्रिय पद्धतीने स्वतःचा भाजीपाला स्वतःच घरच्या घरी पिकवणे, हाच केवळ उद्देश या उपक्रमा मागे आहे.अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील, रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आर. जी. नलवडे, प्रा. एस. एम. एकतपुरे, प्रा. एम. एम. चंदनकर, प्रा. एस. एस.भोसले यांच्या मार्गदर्शनानुसार कृषीमित्र अतिक सय्यद, ऋषिकेश रुईकर, समीर देशमुख, अमोल वसव, अनिरुद्ध बागल, चिन्मय डोणगाव, जिब्रान तांबोळी, पंडित लांडे यांनी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम २०२२-२३ अंतर्गत फलोत्पादन व उद्यानविद्या विभागाद्वारे आयोजन केले होते. याप्रसंगी सर्व कृषीमित्रांनी शेकऱ्यांना मार्गदर्शन केले.







