अकलूज पोलिसांची जुगार अड्यावर धाड 45हजार रुपये चा मुद्देमाल जप्त
अकलूज (प्रतिनिधी )अकलूज पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले पोहेको / १३६ जमीर अब्दुल रफिक शेख (वय ४१ वर्षे) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून १८/०१/२०२३ रोजी आरोपी १) दत्ता सायबू थोरात (वय २५ वर्षे )रा. जुना सराटी रोड विकासनगर, अकलुज ता. माळशिरस २) अरविंद सुनिल कांबळे (वय २५ वर्षे )रा. इराणी मस्जिद जवळ राऊतनगर, अकलुज ता. माळशिरस यांनी विजय चौक येथील गणपती मंदीराशेजारील पत्राचे गाळ्यामध्ये विनापरवाना चोरून टीव्ही स्क्रीनवर येणारे अंक ऑपरेट करून पैशाची पैज लावुन जुगार खेळत असताना मिळुन आले आहेत. अशी फिर्याद दिल्याने अकलुज पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर ३८ / २०२३ महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम ४ प्रमाणे दिनांक १८/०१/२०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्हयाचा तपास पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, सोलापूर ग्रामीण, उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज विभाग डॉ. बसवराज शिवपूजे, पोलीस निरीक्षक अरुण सुगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक सुनिल जाधव, जमीर शेख, दिलीप जाधव, अमोल बकाल यांनी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती काढून सदरची कारवाई केली आहे.सदर आरोपीकडून १) १६,१५०/- रु. रोख रक्कम २) ८,०००/-रू. किमतीचा एक सिव्हर रंगाचा व्हीओ कंपनीचा व्ही ७८५ मॉडेलचा मोबाईल, ३) ५,०००/- रु. किमतीचा एक काळे रंगाचा व्हीओ कंपनीचा २३ प्रो मॉडेलचा मोबाईल, ४) १२,०००/- रु. किमतीची क्राऊन कंपनीची ४३ इंची टीव्ही स्क्रीन, ५) ३,०००/- रू. किमतीचा फोक्सीन कंपनीचा सी पी यु ६) १,०००/- रु. किमतीची टीपी लिंक कंपनीचे डोंगल, ७) ५००/- रु. किमतीचा डेल कंपनीचा कि बोर्ड असा एकुण ४५.६५०/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदर आरोपींना अटक करण्यात आली असून गुन्हयाचा पुढील तपास अमोल बकाल हे करीत आहेत.






