माळशिरस तालुक्यातील निमगाव येथील ग्रामसेवका च्या भ्रष्ट कारभाराविरोधात आमरण उपोषणाचा इशारा
सोलापूर (प्रतिनिधी ) माळशिरस तालुक्यातील निमगाव(मगराचे)येथील ग्रामसेवकाच्या गैरकारभाराबाबत चौकशी करण्यासाठी आमरण उपोषण निमगाव म ता माळशिरस येथील ग्रामसेवकांच्या गावातील गैरकारभाराबाबत चौकशी करण्यासाठी निमगाव येथील केशव आबाजी कुंभार यांनी 2६ जानेवारी रोजी जिल्हा परिषद सोलापुर या ठिकाणी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. अतिक्रमणास प्रोत्साहन, गावातील घरांच्या जागेबाबत खरेदी खत करताना सरकारी महसूल बुङविणे, भ्रष्ट कारभार अतिक्रमण बाबत ग्रामसेवकाला वारंवार पञ देऊनही जाणुन बुजून कारवाई बाबत टाळटाळ करणे या सर्व बाबींची सखोल चौकशी करून या ग्रामसेवकावर त्वरीत कारवाई व्हावी असे निवेदनात नमुद करून या बाबत केशव कुंभार यांनी लेखी तक्रार जिल्हाधिकारी सोलापूर, जि प मुख्याधिकारी,जिल्हा पोलीस प्रमुख, माळशिरस तहसीलदार यांच्याकडे केली आहे.






