माझी वसुंधरा अंतर्गत अकलूज शहरातील 18840 झाडांची माहीती संकलीत.
तज्ञ संस्थेमार्फत नगरपरिषदेकडून वृक्ष गणना; आरोग्यदायी शहरातील वृक्ष गणनेत 18840 झाडांची नोंद झाली आहे.
माझी वसुंधरा अभियान अकलूजचाही सहभाग आहे. अकलूज नगरपरिषद या अभियानात सक्रीय सहभागी आहे. नगरपरिषद प्रत्येक वर्षी शहरातील हरित अच्छादन वाढावे. यासाठी वृक्षारोपण करत आहे. शहरातील मुख्य रस्त्यासह अनेकठीकाणी नगरपरिषदेने वृक्षारोपण केले आहे. त्यामुळे हवेतील कार्बनडायऑक्साईडचे प्रमाण कमी झाले आहे. त्याची एयर काँलीटी मॉनीटर यंत्राने तपासणी तपासणी केली आहे. वृक्षारोपणामूळे ऑक्सीजनचे प्रमाण वाढण्यास मदत झाली आहे. माझी वसुंधरा अभियान अंतर्गत शहरातील वृक्षांची गणना अबेल इलेक्ट्रोसॉफ्ट प्रा. लि. या संस्थेतर्फे जियो टॅगींग द्वारे वृक्षगणना झाली आहे. शहरातील सगळ्या वॉर्डमधील नागरिकांनी व नगरपरिषदेने लावलेल्या वृक्षांची गणना झाली आहे. त्यात 18840 वृक्षांची नोंद झाली आहे. यात 100 प्रकारच्या वृक्ष प्रजाती आहेत. अशी माहिती अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी दिली.






