अकलूज नगरपरिषद हद्दीतील नागरिकांनी परवानगी शिवाय झाडे तोडू नयेत. अन्यथा गुन्हे दाखल करणार -मुख्याधिकारी दयानंद गोरे
अकलूज (प्रतिनिधी )अकलूज ‘नगरपरिषद हद्दितील सुजयनगर 6 बायपास रोड वरील, सी. एस. बी बँके समोरील झाड शंतनू कृष्णकांत टिळेकर रा. अकलूज यांनी तोडले असून,त्यांचेवर अकलूज नगरपरिषदेमार्फत वृक्ष प्राधिकरण झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975 चे कलम 21 नुसार 18/01/2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी अकलूज शहरातील नागरिकांना आवाहन केले असून नगरपरिषद हद्दितील झाडे किंवा झाडांच्या फांद्या तोडणेकरिता नगरपरिषदेची परवानगी घेतल्या शिवाय तोडू नये. विनापरवाना नगरपरिषद हद्दितील झाडे किंवा झाडांच्या फांद्या तोडल्याचे कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. पर्यावरण रक्षणाकरिता नगरिकांनी सहकार्य करावे असे अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी केले आहे.






