[]शासनाच्या सर्व योजना जनतेपर्यंत पोहचवा : धैर्यशील मोहिते पाटील
[]खंडाळी (प्रतिनिधी)[]केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजना सर्वासामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी नूतन सरपंच, उपसरपंच व सदस्यांची असल्याचे प्रतिपादन जिल्हा नियोजन समितीचे सदस्य धैर्यशील मोहिते पाटील यांनी खंडाळी (ता. माळशिरस )येथे ग्रामपंचायत कार्याल्यासमोर झालेल्या नूतन सरपंच, उपसरपंच व सदस्याच्या सत्कार समारंभ प्रसंगी केले. यावेळी समारंभाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे जेष्ठ नेते सुभाष गांधी होते.[]प्रारंभी राष्ट्रपुरुषाच्या प्रतिमेचे पुजन मान्यवाराच्या हस्ते झाले.[] नुतन सरपंच सुनीता सुरवसे, उपसरपंच सुरेखा पताळे, नुतन सदस्य अमर रिसवाडकर, रिकेश चव्हाण, विदया भोसले, तब्बूसमु सय्यद, मनोज खरात, उज्ज्वला सकट, शिवाजी शिंदे,नितीन थोरात आदींचा सत्कार मान्यवरच्या हस्ते करण्यात आला.[]पुढे बोलताना मोहिते पाटील म्हणाले, आदराणीय विजायदादा व बाळदादांनी मी अकलूज ग्रामपंचायतीला निवडून आल्यावर एक मंत्र दिला की निवडणुकीपुरते राजकारण निवडून आले की फक्त समाजकारण तोच दादांचा मंत्र आपण पालन केल्यास जनतेने निवडून दिलेला विश्वास सार्थ ठरेल.शासनाच्या सर्व योजना जनतेपर्यत पोहचतील याची काळजी घ्या. केंद्र शासनाची आरोग्य विभागाची अभा योजना १००% राबविली तर गावाच्या विकासाकामासाठी निधी कमी पडू देणार नाही. सर्वाना भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.[] यावेळी माजी सरपंच हरिदास भोसले,दत्तात्रय रिसवडकर, रावासाहेब भोसले,चेअरमन सुभाष पताळे,परेश राऊत, गौरव राऊत,ऍड. शहाजीराव इंगवले-देशमुख,अशोक पताळे, बाबुराव कदम, राजेंद्र भ. पताळे, मुकुंदराव पताळे,चेअरमान नामदेव पताळे, अमोल मेथा,डॉ. प्रवीण पताळे,अविनाश पताळे,नारायण पताळे, नाना चंदनकर,महेश पताळे,महादेव साबळे, मारुती अवघडे,राजू गोसावी, निखिल गोसावी,सुरेश सुरवसे,विठ्ठल पताळे,अनिल भोसले,सुधाकर सकट, सय्यद, ग्रामसेवक रोडे भाऊसाहेब व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.






