लव जिहाद विरोधी कठोर कायदा करावा,हिंदुत्ववादी संघटनांचे केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांना निवेदन
अकलूज (प्रतिनिधी ) लव जिहादच्या विरोधात एक मध्यवर्ती कठोर कायदा करावा, अशा मागणीचे निवेदन केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा अकलूज ता.माळशिरस येथे आले असता हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन दिले. सध्या अनेक राज्यांमध्ये लव जिहादच्या विरोधात कायदे बनत आहेत परंतु संपूर्ण देशभरात घडणाऱ्या लव जिहादच्या घटना पाहिल्यानंतर यामागे मोठे षडयंत्र व देश विघातक शक्ती कार्यरत असल्याचे लक्षात येते.पाठीमागे घडलेल्या अनेक घटनांवरुन या लव जिहादच्या प्रकरणांमध्ये होणारे आंतरराष्ट्रीय फंडिंग,सुसंघटित व नियोजित घडणाऱ्या घटना आणि त्यातून होणारे गुन्हे व धर्मांतरण,हिंदू मुलींचे होणारे शोषण , बलात्कार ,खून, हत्या असे अनेक प्रकार समोर आलेले आहेत .या सर्व घटना पाहता आपल्या देशाच्या संस्कृती व सभ्यतेविरुद्ध एक अघोषित युद्ध पुकारल्यासारखे झाले आहेत .या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात UAPA प्रमाणे लव जिहाद विरोधी एक मध्यवर्ती व कठोर कायदा बनवावा,अशा विविध मागण्यांचे निवेदन माळशिरस तालुक्यातील समस्त हिंदू संघटनांच्या वतीने अजयकुमार मिश्रा यांना देण्यात आले.यावेळी सर्वश्री सचिन शिंदे,शिवाजी घोडके,विलास काटकर ,किरण चव्हाण, राहूल पद्मन,किरण शिंदे,निलेश ननवरे,संकेत कूलकर्णी यांच्यासह विविध हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकटः
देशात लव जिहादच्या घटना सातत्याने घडत असून विविध माध्यमातून बातमी स्वरूपात सातत्याने या गोष्टी समोर येत असतात याला कुठे तरी आळा घातला पाहिजे.धर्मांतरणाला ही बंदी घातली पाहिजे जबरदस्तीने किंवा मर्जीने कोणत्याही प्रकारचे धर्मांतरणास परवानगी नसावी यासाठी सरकारने कठोर कायदा करावा.
सचिन शिंदे,जेष्ठ कार्यकर्ते,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ






