*निरोगी-सदृढ आरोग्या बरोबर आनंद-समाधान मिळवण्याचं आव्हान…!**- स्वरूपाराणी मोहिते-पाटील*
शिवनिर्णय संघटना व वेलनेस फॉरएव्हर यांच्या संयुक्त विद्यमाने संग्रामसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर समारंभात अध्यक्षीय भाषणात स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांनी वरील उदगार काढले.पूर्वी जात्यावर दळण करण्यामुळे व अशा अनेक गोष्टींमुळे शाररिक आरोग्य ठणठणीत असायच परंतु या भौतिक जगात अत्याधुनिक साधन सामुग्रीचा रोजच्या जीवनशैलीत अवलंब अमर्यादित झाल्यामुळे शाररिक हालचाल मंद होऊन लहान मुलं,पुरुष आणि महिलांमध्ये शाररिक व्याधी व आजारपणात वाढ होताना दिसत आहे.अशी खंत व्यक्त केली. यावेळी डॉ.एम.के.इनामदार,मुख्याधिकारी दयानंद गोरे,डॉ.संतोष खडतरे यांनी मनोगत व्यक्त केलं.
तसेच . प्रोफेसर मीनाक्षी अमोल जगदाळे (जिजाऊ ब्रिगेड सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष )यांनी यावेळी बोलताना सांगितले की, बाहेरचे फास्ट फूड खाण्यापेक्षा सकस आहार घ्यावा. व आपली जीवनशैली बदलावी. असे सांगितले त्याच बरोबर डॉ.मिलिंद जामदार,डॉ.रावसाहेब गुळवे,वैद्यकीय अधिकारी डॉ.संकल्प जाधव,डॉ.एस.जे.आवटे,रामचंद्र गायकवाड,मख्याध्यपक प्रताप पाटील या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.जवळपास ३२० लाभार्थींना शिबिराचा लाभ मिळाला असून यामध्ये दंत तपासणी,सर्दी,खोकला,ताप,उच्च रक्तदाब ,त्वचा विकार,पित्तासह सर्व शाररिक व्याधी यावर मोफत उपचार देण्यात आले. त्याचबरोबर मधुमेह,रक्त तपासणी,कम्प्लिट ब्लड काऊंट,कॅल्शिअम,थायरॉड,हिमोग्लोबिन या रक्त तपासण्या करण्यात आल्या.विद्यार्थ्यांना प्रथोमोपचार किट,शिबिरार्थींना मास्क-सॅनिटायझर चे किटचे वाटप करणेत आले.कार्यक्रम यशस्वी करणेसाठी अजिंक्य तारळकर,गणेश गायकवाड,महादेव पाटील,उमेश गुळवे,अशोक कारंजे,आकाश लकडे,बापू वैद्य,शिवाजी बागल,प्रफुल्ल आंधळकर,निंबाळकर सर,जितेंद्र बाजारे यांनी योगदान दिले.शिक्षण प्रसारक मंडळ,अकलूज,नगरपरिषद अकलूज व प्राथमिक आरोग्य केंद्र यांचं विशेष सहकार्य लाभलं.यावेळी प्रास्ताविक उत्कर्ष शेटे तर सूत्रसंचालन प्रथमेश उरवणे यांनी केलं.




















