श्री अकलाईदेवी देवस्थान श्री क्षेत्र अकलूज येथे श्री शाकंभरी पौर्णिमा साजरी होणार.
अकलूज (प्रतिनिधी ) श्री अकलाईदेवी देवस्थान श्री क्षेत्र अकलूज. यांच्या वतीने
सालबाद प्रमाणे श्री अकलाईदेवी मंदिरामध्ये या वर्षी श्री शाकंभरी पौर्णिमा शुक्रवार दिनांक:- ६ जानेवारी २०२३ रोजी साजरा करण्यात येणार आहे. त्या निमित्त सर्व भाविकभक्तांनी व ग्रामस्थांनी यथाशक्ती स्वइच्छेने देवीस नैवेध्यास भाजी भाकरी किंवा कोणताही पदार्थ सकाळी १० ते ११ या वेळेत मंदीरामध्ये घेऊन येणे तसेच दु. १२ वा ०५ मी. देवीला महानैवेद्य दाखवून महाआरती करण्यात येईल त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल.
तसेच सायं ७ वाजता महाआरती व छबीना काढण्यात येईल तरी सर्व भाविकभक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा. असे आवाहन मंदिराचे कार्यकारी विश्वस्त जयसिंह शंकरराव मोहिते पाटिल यांनी केले आहे.







