नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला अकलूज पोलिसांच्या वतीने दारू नको, दूध प्या. हा अभिनव उपक्रम.
अकलूज (प्रतिनिधी ) अकलूज पाेलीसांच्या वतीने कायदा व सुव्यवस्था जोपासण्या साठी नेहमीच विविध उपक्रम राबविले जातात. याचबरोबर संस्क्रती जपणे हे देखील नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला अकलूज पाेलीस आणि पाेलीस मित्र परीवाराने दाखवून दिले आहे. नवीन वर्षाचे स्वागत करताना नागरिकांनी व्यसनाच्या आहारी जाऊन आपले कुटूंब उध्वस्त न करता, मानवी शरीराला पौष्टिक असणारे दूध पिऊन स्वागत करावे. असे आवाहन अकलूज पोलीस ठाणे चे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी यावेळी केले.हा उपक्रम राबविण्यासाठी यावेळी पत्रकार ,पालक वर्ग,यांचेसह पाेलीस मित्र व रस्त्यावरून ये -जा करणारे दाेनचाकी व चारचाकी वाहन धारक यांना रस्त्यावर गांधी चाैकात थांबवून ३१ डिसेंबर २०२२ चे रात्री ९।३० ते १०।०० वा दरम्यान स्वत: पाेलीस निरीक्षक अरूण सूगावकर,सपाेनि गणेश चाैधरी यांनी वाहन धारकांना गरम मसाला दूध देवून नवीन वर्षाचे स्वागत आनंदाने करा. असा संदेश दिला.यावेळी साेबत पाेलीस मित्र परीवाराचे आणि अकलूज पाेलीस स्टेशनचे समन्वयक व शहर बीट अमंलदार रमेश सूरवसे पाटील यांची टीम विष्णू आंधळकर,मंगेश बूराडे,सूधीर गिरी,श्रीकांत धनवडे, किरण भांगे, सुनील भगत,साै.रूपाली गांधी,नंदकूमार कांबळे, यांचेसह अनेक मान्यवर व सामाजीक कार्यकर्ते यावेळी हजर हाेते. यात ५० ते ६० लाेकांचा राेडवरचा बदलता प्रवाह दूध पिवून जात हाेता. राज्यात हाेणा-या या उपक्रमाला ग्रामीण भागातूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावरून अकलूज शहर लवकरच दारूमूक्त होईल. असा विश्वास नागरिकांना वाटत आहे.













