संत निरंकारी मंडळ अकलूज शाखेच्या वतीने 1जानेवारी रोजी जयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते रक्तदान शिबिराचे आयोजन
अकलूज (प्रतिनिधी )संत निरंकारी चॅरिटेबल फौंडेशन दिल्ली सलंग्नीत संत निरंकारी मंडळ अकलूज शाखेच्या वतीने 1जानेवारी रोजी निरंकारी सत्संग भवन, इंदापूर रोड अकलूज या ठिकाणी सकाळी 9ते संध्याकाळी 5वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.सदर शिबिराचे उदघाटन स. म. सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह (बाळदादा )मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे. तर संत निरंकारी मंडळ चे ज्ञानप्रचारक चाँदभाई तांबोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.अकलूज आणि परिसरातील नागरिकांनी या शिबिरात बहूसंख्येने सहभागी होऊन रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासावी. असे आवाहन ब्रँच कमिटी सदस्य लालासाहेब अडगळे(मोबाईल -9923475915.)व सेवादल युनिट नं.825चे संचालक दिलीप कांबळे (मोबाईल -9890433216)यांनी केले आहे.









