*उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय, अकलूज येथे ग्राहक दिन साजरा करण्यात यावा- अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा -अकलूज यांची मागणी*
अकलूज (प्रतिनिधी )अखिल भारतीय ग्राहक पंचायत, शाखा-अकलूज शहर यांनी उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय येथे २४ डिसेंबर हा दिवस ‘ग्राहक दिन असल्यामुळे या निमित्तानं दि.२२ डिसेंबर रोजी उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय अकलूज येथेलि अधिक्षक यांना शुभेच्छा पत्र देऊन ग्राहक दिन साजरा करावा अशी विनंती केली. व फ्लेक्स लावण्यात आला. यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा- अकलूज शहर अध्यक्ष लालासाहेब अडगळे, समन्वयक अमित पुंज सदस्य शैलेश दिवटे, राजेंद्र खरात व उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय अकलूज येथिल अधिकारी उपस्थित होते,








