अकलूज येथे महामानव यांच्या विषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ अकलूज बंद व आक्रोश मोर्चाला प्रतिसाद अकलूज (प्रतिनिधी )महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, सावित्रीबाई फुले, यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यपाल भगतसिंह कोशारी, सुधांशू त्रिवेदी, या भाजप नेत्यांच्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ अकलूज बंद ठेवून सर्वपक्षीय सर्व समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला याप्रसंगी हा मोर्चा डाॕ. आंबेडकर स्मारका पासुन प्रारंभ झाला तो पुढे अण्णाभाऊ साठे चौक ,गांधी चौक सदुभाऊ चौक मार्गे परत आंबेडकर चौकात आल्यानंतर मोर्चाचे रुपांतर निषेध सभेत झाले, तसेच यावेळी अकलूज येथील उपविभागीय अधिकारी यांना मागणीचे निवेदन देण्यात आले यामध्ये 1) उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अनुसूचित जातीच्या व्यक्तीबाबत आक्षेपार्ह शब्दात बोलून अनादर केल्याप्रकरणी त्यांच्यावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमात अधिनियम 1989 ॲट्रॉसिटी ॲक्ट मधील कलम 3(1)(फ) व भारतीय दंड संहिता 1860 मधील कलम 504 अन्वये गुन्हा नोंद होऊन कायदेशीर कारवाई करावी2) महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना त्वरित पदमुक्त करणे विषयी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा3) मनोज गरबडे व त्यांच्या दोन साथीदारावरील गुन्हे मागे घ्यावेत तसेच वरील तीन मुद्द्याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी योग्य ते निर्णय घ्यावा अन्यथा याप्रकरणी अनेक प्रकारचे व्यापक आंदोलने नजीकच्या काळात आम्ही करू असाही इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.याप्रसंगी सर्व समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.







