अकलुज शहर युवासेनेची मागणी प्रांत अधिकारी यांना युवासेनेचे निवेदन
अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या जाचक अटी रद्द करा – शेखर खिलारे
अकलुज शहर युवासेनेची मागणी प्रांत अधिकारी यांना युवासेनेचे निवेदन
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची थेट कर्ज योजना सध्या जाचक ठरत आहे, आठ वर्षानंतर कर्ज वाटप सुरू झालेल्या या महामंडळाकडून सिबिल स्कोर आणि दोन सक्षम जमीनदार या अटींमुळे समाजातील बेरोजगार युवकांना याचा लाभ घेता येत नाही व स्वतःचा व्यवसाय करण्यापासून समाजातील युवक वंचित राहण्याची शक्यता नाकारता येणार नाही. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील मातंग समाज हा आर्थिक दृष्ट्या कंगाल आहे. समाजातील बेरोजगार युवकांची संख्या जास्त आहे अशा परिस्थितीत शासनाने अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या कर्ज योजनेच्या अटी जाचक करून सर्वसामान्य लोकांवर मोठा अन्याय केला आहे तरी लोकसंख्येप्रमाणे उद्दिष्टे वाढवून मिळावीत या मागणी आठ वर्षांनंतर सुरू झालेल्या लोकशाहीर आण्णाभाऊ साठे महामंडळाच्या पोटजातीतील थेट कर्ज योजनेसाठी उद्दिष्ट प्रमाण कमी ठेवण्यात आले आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये मातंग समाजाची लोकसंख्या जास्त असल्याने लोकसंख्येप्रमाणे उद्दिष्ट वाढवून मिळावीत या मागणीसाठी युवासेना अकलूज शहराच्या वतीने अकलूज प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले व कर्ज योजने संदर्भातील जाचक अटी रद्द न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा युवासेना अकलूज शहरप्रमुख शेखरभैय्या खिलारे यांनी दिला आहे त्यावेळी सचिन खिलारे,विशाल गवळी,इत्यादी उपस्थित होते.सदर निवेदन नायब तहसिलदार देसाई मॅडम यांनी स्वीकारले.






