महाराजा राजाधीराज श्रीमंत महाराज यशवंतराव होळकर यांची 246 वी जयंती अकलूज येथे साजरी.
अकलूज (प्रतिनिधी )महाराजा राजाधीराज श्रीमंत महाराज यशवंतराव होळकर यांची 246 वी जयंती अकलूज परिसर धनगर समाज उन्नती मंडळाच्या वतीने साजरी करण्यात आली.या प्रसंगी शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धैर्यशील मोहीते पाटील, पंचायत समिती चे माजी उप सभापती अर्जुनसिह मोहिते पाटील,अकलूज ग्रामपंचायत चे माजी सरपंच किशोरसिह माने पाटील शिवाजीराव बंडगर, अकलूज पोलीस ठाणे चे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, अकलूज नगरपरिषद चे मुख्याधिकारी दयानंद गोरे व इतर अनेक सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिलीप किसन होनमाने,अध्यक्ष मल्हार बहुउद्देशीय व सामाजिक संस्था, लक्ष्मीकांत दगडू वाघे,अध्यक्ष अकलूज परिसर धनगर समाज उन्नती मंडळ अकलूज, तसेच संजय पाडोळे, शिवाजी घोडके,अभय सुसलादे, अज्ञानराव मोटे, सुधाकर पोटे,नागेश पोटे, सागर देवकाते, नागेश शिंदे, अमोल राजगे, संजय पिसे, रूपेश पोटे,आकाश खरात,राहुल माने, निलेश ठोंबरे,सचिन सरगर,अभिषेक घुले, महेश वगरे व अनेक समाज बांधवांनी सहकार्य केले.












