*सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये मा . श्री. जयसिंह मोहिते – पाटील (बाळदादा) यांचे वाढदिवसानिमीत्त रक्तदान शिबीर संपन्न*
अकलूज दि . ०१ : सहकार महर्षि शंकरराव मोहिते – पाटील इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड रिसर्च , शंकरनगर – अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये संस्थेचे अध्यक्ष मा . श्री . जयसिंह शंकरराव मोहिते – पाटील यांच्या ७३ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून दि . ०१/१२/२०२२ रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले . रक्तदान शिबीराचे उद्घाटन संस्थेचे सचिव मा . श्री . राजेंद्र चौगुले यांचे हस्ते करण्यात आले . रक्तदान शिबीराकरीता सहकार महर्षि शंकरराव मोहिते – पाटील ब्लड बँक , अकलूज मधील डॉ . सुजित गांधी , श्री . मयूर माने व इतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले . रक्तदान शिबीरामध्ये श्री. महादेव अंधारे , श्री . सुर्यकांत गोडसे , महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी , तसेच विद्यार्थी यांनी उत्फुर्तपणे प्रतिसाद देवून समाजाप्रती असलेली आपली बांधीलकी जपली . सदर शिबीरामध्ये एकुण ८ ९ रक्तदात्यांनी रक्तदान केले . शिबीर सुरळीत पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे प्र . प्राचार्य सागर फुले, कार्यालयीन अधिक्षक विक्रमसिंह बागल, सर्व विभागाचे विभागप्रमुख , शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी काम पाहिले .








