आनंदनगर ग्रामपंचायत संदर्भात ‘त्या’ बातमीमुळे ओतले आगीत तेल
अकलूज : आनंदनगर ग्रामपंचायत निवडणुक लागल्याने आरोप प्रत्यारोपामुळे तापलेल्या वातावरणात एका दैनिकात आलेल्या ‘त्या’ बातमीने आगीत तेल ओतले असून त्याचे पडसाद संपूर्ण गावभर उमटले आहेत.माळशिरस तालुक्यातील 35ग्रामपंचायत ची निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून, या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सध्या केलेल्या विकासकामे संदर्भात आरोप -प्रत्यारोप होताना दिसत आहेत.दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील एका नामांकित दैनिकात यासंदर्भात एक बातमी प्रकाशित झाली असून पंधराव्या वित्त आयोगातून आलेल्या निधीतून 50टक्के च्या आत विकास निधी खर्च केलेल्या ग्रामपंचायत मध्ये माळशिरस तालुक्यातील बांगर्डे आणि आनंदनगर या ग्रामपंचायत चा समावेश असल्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे.सोलापूर जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांनी जिल्ह्यातील 11पंचायत समिती पैकी 8पंचायत समिती च्या गटविकास अधिकारी यांना सदर ग्रामपंचायत चे सरपंच,ग्रामसेवक यांच्यासह पर्यवेक्षकीय अधिकारी यांच्या विरोधात नियमानुसार प्रशासकीय कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.असा उल्लेख सदर बातमीत करण्यात आला आहे.पंधराव्या वित्त आयोग अंतर्गत केंद्र व राज्य सरकार कडून ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विकासासाठी निधी उपलब्ध होत असतो.या अनुषंगाने माळशिरस तालुक्यातील आनंदनगर ग्रामपंचायत साठी देखील निधी आला असून अनेक विकासकामे पूर्ण झाली आहेत. तर उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व साहित्य देखील खरेदी करण्यात आले असून, सध्या ग्रामपंचायत ची निवडणूक प्रक्रिया चालू असल्यामुळे ही कामे तात्पुरती थांबविण्यात आली असून. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ती कामे मार्च महिन्या पर्यंत पूर्ण होतील. असे आनंदनगर ग्रामपंचायत ची कामे करणारे ठेकेदार यांनी सांगितले.सदर वृत्तपत्रात बातमी प्रकाशित झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात यावरून आरोप -प्रत्यारोप केले जात आहेत.तसेच सदर वृतपत्रात प्रसिद्ध झालेली बातमी व्हाट्सअप ग्रुप वर टाकून आपल्या गाव चा आर्थिक विकास हा हॅश टॅग वापरून केवळ राजकीय आकसापोटी विरोधक सत्ताधारी गटाची नाहक बदनामी करीत आहेत.त्यामुळे निवडणुकीत नामनिर्देशन सादर करण्या अगोदरच चांगली रंगत निर्माण झाली आहे.
चौकट :-
आपल्या माळशिरस तालुक्यात चौदाव्या वित्त आयोगातून आलेला निधी पूर्णपणे खर्च करण्यात आला असून, पंधराव्या वित्त आयोगातून आलेल्या निधीतून अनेक कामे पूर्ण झाली आहेत. तसेच राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी मार्च महिन्यापर्यंत मुदत असून तीही कामे प्रगती पथावर आहेत. त्याचप्रमाणे माळशिरस तालुक्यातील ग्रामपंचायत च्या सरपंच, ग्रामसेवक यांचेवर कारवाई करण्यासंदर्भात मला कोणत्याही प्रकारचे पत्र आलेले नाही.
विनायक गुळवे.गटविकास अधिकारी.पंचायत समिती, माळशिरस.
चौकट :-
आनंदनगर ग्रामपंचायत साठी पंधराव्या वित्त आयोगातून आलेल्या निधीतून काही कामे पूर्ण झाली आहेत. तर उर्वरित कामासाठी आवश्यक असलेले साहित्य खरेदी करण्यात आले आहे. तसेच वर्क आऊट देखील काढण्यात आली आहे. परंतु सध्या निवडणूक प्रक्रिया सुरु असल्यामुळे आचारसंहिते चा भंग होऊ नये म्हणून निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राहिलेली सर्व कामे मार्च महिन्यापर्यंत पूर्ण केली जातील. तसेच 70%पेक्षाही अधीक कामे पूर्ण झाली असून आलेला निधी परत गेलेला नाही.
मेघना इनामके.सरपंच.आनंदनगर ग्रामपंचायत.
चौकट :-
राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून पंधराव्या वित्त आयोगातून आनंद नगर ग्रामपंचायत साठी गावाच्या विकासासाठी आलेल्या निधीतून आतापर्यंत 70%पेक्षा जास्त विकासकामे पूर्ण झाली असून, राहिलेली30% सर्व कामे सुद्धा मार्च महिन्या पर्यंत 100%पूर्ण होतील. त्यामुळे निधी परत जाण्याचा प्रश्नच उरत नाही.
वसंतराव गायकवाड.उप सरपंच.आनंदनगर ग्रामपंचायत.
चौकट :-
माळशिरस तालुक्यातील आनंदनगर ग्रामपंचायत संदर्भात वर्तमान पत्रात चुकीची बातमी प्रकाशित झाली असून, सदरची बातमी प्रकाशित करण्यापूर्वी सदर प्रतिनिधी यांनी माझ्याशी कोणत्याही प्रकारे संपर्क साधलेला नाही. सदरची बातमी पूर्णपणे खोडसाळ पणाची व दिशाभूल करणारी आहे. तसेच पंधराव्या वित्त आयोगातून आलेल्या निधी च्या माध्यमातून अनेक विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत. तसेच राहिलेली कामे देखील येत्या दोन तीन महिन्यात पूर्ण होतील. त्यामुळे निधी परत जाण्याचा प्रश्न उदभवत नाही.
नितीन शेलार.ग्रामसेवक.आनंदनगर ग्रामपंचायत.






