शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी केले उदय शेटे आणि परिवाराचे सांत्वन
अकलूज ((प्रतिनिधी )अकलूज येथील प्रसिद्ध आडत व्यापारी कै.सुर्यकांत जगन्नाथ शेटे (सुरेश आप्पा) यांचे दि.२२/११/२०२२ रोजी दुःखद निधन झाले. या पार्श्वभूमीवर अकलूज ग्रामपंचायत चे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी 27नोव्हेंबर रोजी सांत्वनपर भेट देऊन कै. सूर्यकांत शेटे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.उदय शेटे व शेटे परिवारास भावनिक आधार देत सांत्वन केले.व मोहिते पाटील कुटूंबातील सर्व सदस्य आपल्या दुःखात सहभागी आहेत. असे आवर्जून सांगितले.याप्रसंगी अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती चे सचिव राजेंद्र काकडे, चंद्रकांत शेटे,मिलिंद गायकवाड, उदय शेटे, उत्कर्ष शेटे, अतुल शेटे व इतर सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.







