चाकोरे गावातील दारूबंदीची मागणी;पोलीस प्रशासन सतर्क
अकलूज/प्रतिनिधी:
चाकोरे प्रतापनगर(ता.माळशिरस)गावातील 7 अवैध दारूधंदे बंद करण्याची विशेष महिला ग्रामसभेत महिलांनी मागणी केली.याबाबत ग्रामपंचायतीने सतत ठराव मंजूर करूनही दारूबंदी होत नाही.यामुळे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर माळशिरस पोलीस स्टेशनचे पो.नि.दिपरतन गायकवाड, बीट अंमलदार बोंद्रे व रुपनवर यांनी गावात दोन बैठका घेऊन दारूबंदी बाबत आढावा घेतला आहे.खंडोबा यात्रेच्या पार्श्वभूमीवर तडीपारी प्रस्ताव तयार करणार असल्याचे सांगत ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. ग्रामपंचायतीने अवैध दारू विक्रेत्यांना नोटीस देऊन शासकीय दाखले,रेशन देणे बंद केले आहे.शासकीय जागेत दारूविक्री करणाऱ्यांना अतिक्रमन काढण्याची नोटीस ग्रामपंचायतीने दिली आहे.गावात डीसीसी.बँक,माध्य. विद्यालय,जि.प. शाळा,पोस्ट,तलाठी,ग्रामपंचायत व सोसायटी ऑफिस,म्हसोबा देवस्थान या ठिकाणी मद्यपींचा कायम उपद्रव असतो.गावासाठी असणारी दोन पोलीस पाटील पदे रिक्त आहेत त्यामुळे गावात बीट पोलीस चौकी मंजूर होणे अत्यंत गरजेचे असल्याची मागणी जोर धरत आहे.यावेळी सरपंच नवनाथ जाधव,उपसरपंच सचिन कचरे,ग्रामपंचायत सदस्य,महिला,ग्रामस्थ व युवक एकजुटीने उपस्थित होते.”







