*अकलूज नगरपरिषदेच्या वतीने भारतीय संविधान दिन विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला.
*अकलूज नगरपरिषद मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज नगरपरिषद कार्यालय येथे संविधान दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व भारतीय संविधान प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले.मुंबई येथील 26/11 दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेले अधिकारी/ कर्मचारी व निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.त्यानंतर मुख्याधिकारी यांनी नगरपरिषद कार्यालय प्रांगणात सर्व नगरपरिषद कर्मचारी यांना माझी वसुंधरा शपथ देण्यात आली.स्वच्छ भारत अभियान व माझी वसुंधरा 3.0 अभियान अंतर्गत आज अकलूज नगरपरिषद हद्दीतील ताम्हाणे नगर या भागात मुख्याधिकारी गोरे साहेब यांच्या उपस्थितीत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ताम्हाणे नगर हा भाग लहान मुलांचे हॉस्पीटल, एक्सीडेंट उपचार हॉस्पीटल, त्वचा संबंधीत आजाराचे निदान करणारे हॉस्पीटल भाग म्हणून प्रसिध्द असल्यामुळे येथे मोठया प्रमाणावर माळशिरस तालुका तसेच आसपास तालुका, जिल्ह्यातून नागरिक येत असतात. परंतु येथे मोठया प्रमाणावर काटेरी झुडपे, हॉस्पीटल जैव वैद्यकीय कचरा साचला होता. तो सर्व कचरा स्वतः मुख्याधिकारी व नगर परिषद कर्मचारी यांनी गोळा करून स्वच्छता करण्यात आली. तसेच परिसरातील हॉस्पीटल यांना आपला जैव वैद्यकीय कचरा उघड्यावर सार्वजनिक ठिकाणी न टाकता MPCB तर्फे नेमण्यात आलेल्या संस्थेच्या कर्मचारी यांच्याकडेच द्यावा. अन्यथा अशा हॉस्पीटल वरती कायदेशीर कारवाई करण्याची सूचना देण्यात आली.तसेच परिसरातील दुकानदार, हॉटेल यांनी आपला कचरा मोकळ्या ठिकाणी, जागेत न टाकता अकलूज नगरपरिषदेच्या घंटा गाडीतच टाकावा अशी सूचनाही दिली.अकलूज नगरपरिषद, अकलूज पोलीस ठाणे व दि आर्ट ऑफ लिव्हींग, अकलूज शाखा,आम्ही अकलूजकर यांचे संयुक्त विद्यमाने मुंबई येथील २६/११ रोजी दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेले अधिकारी, कर्मचारी यांचे स्मरणार्थ व भारतीय संविधान दिना निमित्त अकलूज पोलीस ठाणे येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा.श्री. विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी अकलूज नगरपरिषद मुख्याधिकारी श्री.दयानंद गोरे, पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर,माजी पोलीस निरीक्षक विश्वास साळोखे,प्रा.धनंजय देशमुख,डॉ.वसुंधरा देवडीकर,डॉ. संतोष खडतरे व नगरपरिषद कर्मचारी आदी उपस्थित होते. या शिबिरात मुख्याधिकारी दयानंद गोरे, नगरपरिषद कर्मचारी, पोलीस कर्मचारी तसेच ७५ जणांसह शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या एन सी सी च्या विद्यार्थ्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधीलकी जपली.






















