*शिवरत्न नॉलेज सिटी मध्ये नवमतदार नोंदणीसाठी शिबिर*
अकलूज: (प्रतिनिधी )मतदार नोंदणी सप्ताह व संविधान दिवसाचे औचित्य साधून माळशिरस तहसील कार्यालय तसेच शिवरत्न शिक्षण संस्था संचलित विजयसिंह मोहिते पाटील काॅलेज ऑफ नर्सिंग ॲन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज आणि ग्रीन फिंगर्स कॉलेज ऑफ कंप्युटर टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने शिवरत्न नाॅलेज सिटी येथे नवमतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी माळशिरस तहसीलचे तहसीलदार जगदीश निंबाळकर व उपजिल्हाधिकारी तथा परीक्षाधीन अप्पर तहसीलदार अजिंक्य गोडसे व निवडणूक महसूल सहाय्यक डी.एस. काळकोटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. अरविंद कुंभार यांनी केले. भारत हा जगात सर्वात मोठी लोकशाही असलेला देश म्हणून ओळख आहे. लोकशाहीत मतदाराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. निवडणूक प्रक्रियेत मतदार महत्वाची भूमिका बजावतो. महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची नावे मतदार यादीत नोंदणी व्हावी यासाठी आजच्या शिबिराची आयोजन केल्याची माहिती डॉ. कुंभार यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली. मतदान प्रक्रियेत युवकांचा सहभाग महत्वपूर्ण आहे. देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे. यासाठी युवाशक्तीचा सहभाग महत्त्वाचा आहे असे प्रतिपादन आपल्या मार्गदर्शनातून तहसीलदार निंबाळकर यांनी केले. देशाच्या, राज्याच्या तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणूका प्रगतीसाठी अतिशय महत्त्वाचे ठरतात. या निवडणुकीत मतदाराला विशेष प्राधान्य आहे. अठरा वर्षे पूर्ण झालेल्या किंबहुना सतरा वर्षात पदार्पण केलेल्या मतदारांना आपली नाव नव्याने मतदान यादीत समाविष्ट करता येते असे आवाहन अप्पर तहसीलदार गोडगे यांनी केले. या वेळी विजयसिंह मोहिते पाटील काॅलेज ऑफ नर्सिंग ॲन्ड मेडिकल रिसर्च शाखेचे स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य नितिन दोशी, प्राचार्या डॉ. सुमती, उपप्राचार्य शिवतीर्थ हिरेमठ, ग्रीन फिंगर्स कॉलेज ऑफ कंप्युटर टेक्नॉलॉजचे समन्वयक संजय साळुंखे, शिवरत्न शिक्षण संस्थेचे प्रशासनाधिकारी अश्रफ शेख, तिन्ही महाविद्यालयातील प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. नावनोंदणी व शिबीर आयोजनासाठी प्रा. भरत साठे, प्रा. कुंभार, प्रा शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘ग्रीनफिंगर्सचे’ प्रा. धनश्री हातोळकर यांनी केले तर आभार ‘शिवरत्न मॅनेजमेंटचे’ प्रा. नागेश मगर यांनी मानले.
चौकट:
अठरा वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे नाव समाविष्ट करण्यासाठी ही शिबिर आयोजित केली आहे. निवडणूक प्रक्रियेत त्यांना केवळ मतदानाचा हक्क बजावता होतो असे नसून त्यांना उमेदवार म्हणूनही भूमिका बजावतात येते. मतदार यादीत नाव समाविष्ट केल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या करीअर करण्यात बऱ्याच ठिकाणी उपयोग होतो. – धैर्यशील मोहिते-पाटील अध्यक्ष शिवरत्न शिक्षण संस्था, अकलूज











