अकलूज येथील सेवानिवृत्त शिक्षिका सौ.शोभना अनगळ यांचे दुःखद निधन.
अकलूज (प्रतिनिधी )अकलूज येथील सेवानिवृत्त शिक्षिका सौ.शोभना अनगळ(वय -86वर्षे )यांचे 25नोव्हेंबर रोजी सकाळी दुःखद निधन झाले.शिक्षण प्रसारक मंडळ,अकलूज येथे सदाशिवराव माने विद्यालयात शिक्षिका म्हणून त्या काही वर्षांपूर्वी कार्यरत होत्या. त्यानंतर त्या सेवानिवृत्त झाल्या.मराठी व हिंदी विषय त्या शिकवीत होत्या.त्यांच्या हाताखाली असंख्य विद्यार्थी घडलेच आणि त्या प्रत्येकाच्या मनात घर करून राहण्याची हातोटी व त्याच्या कडे वैयक्तिक लक्ष व तक्रारी अगदी घरी सांगून त्याचा सर्वांगीण विकास होईल. यासाठी मार्गदर्शन करणे ही त्यांची खासियत होती.पाटिलवस्ती येथील कृष्णानंद विद्यामंदिर येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले संतोष अनगळ यांच्या त्या मातोश्री होत्या.त्यांच्या पश्चात त्यांचे पती सेवानिवृत्त शिक्षक जगन्नाथ अनगळ,दोन मुले, चार मुली, जावई, सुना व नातवंड असा परिवार आहे.त्या अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.






