*द ग्रीनफिंगर्स स्कूलची जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत नेत्रदिपक कामगिरी.*
संग्रामनगर दि.२५ (केदार लोहकरे यांजकडून)सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरिय फुटबॉल स्पर्धेत द ग्रीन फिंगर्स स्कूलने अंतिम सामन्यात अरिहंत पब्लिक स्कूलचा 7-0 असा पराभव केला.अंतिम सामन्यात अनुज जगताप 3 विशाल खटके व निशांत देसाई याने प्रत्येकी 2 गोल करीत विजायामध्ये मोलाचा वाटा उचलला.सोलापूर येथे होणाऱ्या विभागीय फुटबॉल स्पर्धेसाठी द ग्रीन फिंगर्स स्कूलची निवड झाली. संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष रणजीतसिंह मोहिते पाटील,वरिष्ठ विश्वास्त सौ.सत्यप्रभादेवी मोहिते पाटील,सचिव धैर्यशील मोहिते पाटील,स्कूलचे चेअरमन नितिन महादेवराव इंगवले देशमुख व मुख्याध्यापक उमाकांत बराल यांनी पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या. सर्व खेळाडूस क्रीडा प्रमुख शिकारे उमेश व फुटबॉल प्रक्षिशक पृथ्वीराज पराडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले .






