अकलूज येथील आडत व्यापारी सूर्यकांत जगन्नाथ शेटे यांचे हृदयविकाराने निधन.
उदय शेटे यांना पितृशोक.
अकलूज (प्रतिनिधी )येथील प्रसिद्ध आडत व्यापारी आणि शिवभक्त सूर्यकांत(आप्पा )जगन्नाथ शेटे (वय 70 वर्षे) यांचे 22नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजून दहा मिनिटांनी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.
अकलूज येथील आडत मालाचे प्रसिद्ध व्यापारी उदय (बापू )शेटे यांचे ते वडील होते.
त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुले, दोन सुना, एक विवाहित मुलगी , नातवंडे असा परिवार आहे.
अकलूज बाजार पेठेत विशेषतः अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये दर सोमवारी शेतकऱ्यांचा शेतीमाल खरेदी करण्यापासून ते ग्राहकांना थेट योग्य दरात विक्री करण्यासाठी आप्पा नेहमी येतं असतं.
सामाजिक कार्यामध्ये नेहमी हिरीरीने सहभाग घेत असत.विजय चौकातील शिवरत्न गणेश मंडळा मध्ये त्यांचं मोठं योगदान होतं.
अकलूज विरशैव लिंगायत समाजाच्या प्रत्येक गोष्टीत सहभागी होत युवकांना मार्गदर्शन करत.
त्यांच्या निधनामुळे लिंगायत समाजाची मोठी हानी झाली आहे ,
ते अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांच्या निधनामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांचेवर लिंगायत स्मशाभूमी येथे संध्याकाळी 8-30वाजता अंत्यविधी करण्यात येणार आहेत.






