मौजे माळखांबी गावातील रखडलेली कामे व नव्याने मंजूर झालेली विविध विकास कामे तातडीने पूर्ण करावी या मागणीसाठी दलित महासंघाचे माळखांबी ग्रामपंचायतिवर भोंगा वाजवुन फेसपाडी आंदोलन करनार बच्चन साठे……!*
अकलूज (प्रतिनिधी )मौजे माळखांबी ग्रामपंचायतीने गेल्या दोन वर्षांपासून गावात कोणत्याही प्रकारची नविन विकास कामे केली नाहीत सद्या गावात प्रत्येक विकास कामात अडथळा निर्माण करतांना ग्रामपंचायत सत्ताधारी व्यवस्थाच दिसतं आहे गावातील विकासकामे रखडली त्यामुळे गावाचं खुप मोठं नुकसान झालं आहे तरी गावातील रखडलेली कामे व नव्याने मंजूर झालेली कामे तातडीने पूर्ण करावी गावातिल अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात यावी संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर ग्रामपंचायत मालकिची जागा, व्यायाम शाळा,याची शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई ग्रामपंचायत ला मिळावी म्हणून प्रांत अधिकारी यांना स्मरण पत्र व्यवहार करावा त्याचं ठिकाणची पाण्याची टाकी जमिनदोस्त केलेली दिसुन येत आहे त्यांची नुकसान भरपाई मिळाली का याची चौकशी करावी गेल्या पाच सहा महिन्या पुर्वी पासुन स्मशानभूमीतिल हाय मास्ट बंद पडला आहे तो दुरुस्त करावा गावातील दिवा बंत्तिची सोय करावी चावडी रेशन दुकान शेजारी अतिक्रमण करून दगडी बांधकाम केलेल आहे त्यामुळे रेशन दुकानास धान्य घेऊन येणाऱ्या गाड्यांना व विविध कार्यक्रम महामानवांच्या जयंती मिरवणुकीस,इतर धार्मिक कार्यक्रमाच्या वरातीसाठी त्या दगडी भिंतिचा खूप मोठा अडथळा होत आहे गावातील जुन्या जिर्न झालेल्या भिंती पाडण्यासाठी ग्रामपंचायतीने कार्यवाही करावी ग्रामपंचायतिच्या सर्वं उत्पन्नातून १५%निधी दलित वस्तीत खर्च करून सर्व सुख सुविधा उपलब्ध करव्या गावातिल अपंगत्व असलेल्या व्यक्तींना अपंग निधी तातडीने द्यावा मुस्लिम दफन भुमीला संरक्षण भिंत बांधून दयावी गावातिल रस्त्याची, गटारीची, दिवाबत्ती, ची सोय करावी शहिद जवान गजानन वाघमारे यांच्या स्मारकात लाईट आणी पाण्याची सोय करावी गावातील सार्वजनिक वाचनालय खाजगी जागेतून ग्रामपंचायत कार्यालयात चालू करावे स्मशानभूमीतिल पाण्याची टाकी तातडीने चालू करावी स्मशानभूमी नव्याने उभारण्यात यावी गावातील अवैद्य धंदे बंद करावे या विविध विकास कामांच्या मागणी साठी आम्ही दिनांक 29/11/2022 रोजी मौजे माळखांबी ग्रामपंचायतिवर कार्यालयीन वेळेत बेमुदत भोंगा वाजवुन फेसपाडी आंदोलनास बसनार आहोत अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे अशी माहिती दलित महासंघ विभागप्रमुख बच्चन साठे यांनी दिली






