अकलूज चे ग्रामदैवत श्री अकलाईदेवी देवस्थान अकलूज येथे त्रिपुरारी पोर्णिमा निमित्त लक्ष लक्ष दिव्यांनी उजळला मंदिराचा परिसर
अकलूज (प्रतिनिधी )अकलूज चे ग्रामदैवत श्री अकलाईदेवी देवस्थान अकलूज येथे त्रिपुरारी पोर्णिमा निमित्त सोमवार 7 नोव्हेंबर रोजी सायं. 5-30 ते 7 या वेळेत श्री अकलाईदेवी मंदिर व मंदिर परिसरामध्ये दीपोत्सव आयोजीत करण्यात आला.यावेळीअकलाई मंदिराचा परिसर लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघाला.अकलूज येथे अकलाई मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त *दिपोत्सव* साजरा करण्यात आला .प्रारंभी मंदिराचे विश्वस्त जयसिंह(बाळदादा )मोहिते-पाटील,सौ.सुलक्षणादेवी मोहिते-पाटील व कु.स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांचे हस्ते दिप प्रज्वलीत करण्यात आले.यावेळी मेणबत्ती आणि पणती मुळे अकलाई देवी मंदिराचा परिसर उजळून निघाला होता. अकलूज परिसरातील भाविकांनी पणती, दिवे आणून या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदिराचे पुजारी नंदकुमार गुरव,मोहन गुरव,मदन गुरव, अभिषेक गुरव, अनिकेत गुरव, अक्षय गुरव,अनिरुद्ध गुरव, अद्वैत गुरव यांनी विशेष परिश्रम घेतले.























