व्यंकटनगर व परिसरातील रहिवाशी व नागरीकांसाठी शिवरत्न फौंडेशन व डॉटर्स मॉम्स फौंडेशन व तहसिल कार्यालय,माळशिरस यांच्या संयुक्त विद्यमानाने विविध शासकीय योजना मार्गदर्शन शिबीराचे 12ऑक्टोबर रोजी आयोजन.
अकलूज (प्रतिनिधी )अकलूज येथील व्यंकटनगर व परिसरातील सर्व रहिवाशी नागरिकांसाठी शिवरत्न फौंडेशन व डॉटर्स मॉम्स फौंडेशन व तहसिल कार्यालय,माळशिरस यांच्या संयुक्त विद्यमानाने विविध शासकीय योजना मार्गदर्शन शिबीराचे 12ऑक्टोबर रोजी आयोजन करण्यात आले असून,या शिबिराचे उदघाटन भाजपा चे सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील व डॉटर मॉम्स फौंडेशन च्या अध्यक्षा सौ. शितलदेवी मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे. सदर कार्यक्रमासाठी माळशिरस चे तहसीलदार जगदीश निंबाळकर, अकलूज ग्रामपंचायत चे माजी सरपंच शिवतेजसिंह उदयसिंह मोहिते पाटील,रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील बीज उ. सह.संस्थेचे चेअरमन विलास क्षीरसागर, माळशिरस तालुका भाजपा चे कोषाध्यक्ष सतीश व्होरा यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. विविध शासकीय योजनाचे मार्गदर्शन शिबीर बुधवार दि. १२ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी १० ते ३ वा. पर्यंत व्यंकटनगर-अकलूज,ता.माळशिरस,जि.सोलापूर येथे होणार आहे.तरी सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.परिसरातील नागरिकांनी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे घेवून उपस्थित रहावे. नवीन मतदार नोंदणी करणेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे1) स्वता:चा शाळेचा दाखला २) रेशनकार्ड झेरॉक्स३) आधार कार्ड/बँक पासबुक/पॅनकार्ड झेरॉक्स प्रत (यापैकी एक) 4) कुटूंबातील एक व्यक्तीचे मतदान ओळखपत्र 5) फोटो- १ दुबार रेशनकार्ड मिळविण्यासाठी लागणारी कागदपत्रे.१) तलाठी उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी दाखला व जमिन नसलेचा दाखला 2)कुटूंबातील सर्व व्यक्तीची आधारकार्ड झेरॉक्स प्रत,3)बँक पासबुक झेरॉक्स प्रत (असल्यास )4)गॅस पासबुक (असल्यास )5)फोटो -1.रेशनकार्डमधून नाव कमी करणे, १) तलाठी नाव कमी केलेचा दाखला.२) धान्य दुकानदार नाव कमी केल्याचा दाखला. ३) मूळ रेशनकार्ड. श्रावण बाळ योजनेसाठी लागणारी कागदपत्रे१) ऑनलाईन तहसिलदारचा दाखला 2) तलाठी उत्पन्नाचा (21000/रु.) रहिवासी व जमीन नसलेचा दाखला . ३) स्वत.चा शाळेचा दाखला / मुलांचा शाळेचा दाखला 4) बँक पासबुक झेरॉक्स प्रत (डी.सी.सी.बॅक) 5)फोटो.6)वयाचा दाखला किंवा शाळेचा दाखला. नविन आधार कार्ड नोंदणीसाठी (लहान मुलाचे)१) मुलाचा जन्माचा दाखला ओरिजीनल २) आईचे किंवा वडिलांचे आधारकार्ड.रेशनकार्डमधे नाव समाविष्ठ करणे.1) ज्या व्यक्तीचे नाव समाविष्ठ करणेचे आहे त्याचे आधार कार्ड.२) मुलांचे जन्माचे दाखले.३) पत्नीचे नाव समाविष्ठ करणेचे असल्यास माहेरकडील रेशन कार्डमधून तहसिलदार यांचेकडील नाव कमी केल्याचा दाखला.4) मूळ रेशनकार्ड.संजय गांधी निराधार योजनेसाठी लागणारे कागदपत्रे.1) तहसीलदार उत्पन्नाचा (२१००० रु.) रहिवासी दाखला व जमिन नसलेचा दाखला. २) मुलाचा शाळेचा दाखला व त्याचे आधार कार्ड झेरॉक्स प्रत.३) बँक पासबुक झेरॉक्स प्रत (डी.सी.सी. बँक) 4) पतीचा मृत्युचा दाखला.5) फोटो.6) कौटुंबिक एकत्र फोटो व्यंकटनगर परिसरातील गरजू नागरिकांनी सदर सर्व कागदपत्रे घेऊन उपस्थित राहून सदर शिबिराचा लाभ घ्यावा. असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी माजी ग्रामपंचायत सदस्य विशाल मोरे (मोबाईल -7757079999.)या नंबर वर संपर्क साधावा.







