*शिवरत्न इन्स्टिट्यूट मध्ये बीबीए प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत* (वृक्षारोपण करून व्यवस्थापन शिक्षणास प्रारंभ)
अकलूज : येथील शिवरत्न शिक्षण संस्था संचलित शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज मध्ये आज बीबीए प्रथम वर्षाच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते- पाटील, उपाध्यक्ष सौ. शितलदेवी मोहिते- पाटील, प्रशासनाधिकारी अश्रफ शेख यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील प्राध्यापकांनी मार्गदर्शन केले. प्रा.नागेश मगर यांने तीन वर्षाच्या बीबीए अभ्यासक्रमाविषयी तसेच परीक्षा पध्दत व महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांबद्दल माहिती दिली. प्रा. नितिन कंगळे यांनी शिवरत्न शिक्षण संस्थेविषयी माहिती देऊन संस्थेकडून राबविले जाणाऱ्या ध्येयधोरणाबद्दल माहिती दिली. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. भरत साठे यांनी महाविद्यालयात वर्षभर राबवत असलेल्या उपक्रमाबद्दल माहिती दिली. प्रा.वशीम सय्यद यांनी बीबीए अभ्यासक्रमानंतरच्या करीअर बद्दल माहिती दिली. द्वितीय व तृतीय वर्गातील कु. नीती पटेल, कु. सृष्टी आगलावे व अनिकेत जाधव यांनी महाविद्यालयात आपले अनुभव नवागतांपुढे कथन केला. महाविद्यालयीन शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी व्यासंगी बनून भविष्यातील आपला योग्य मार्ग शोधावा. तसेच दिननित्य अवांतर वाचन, व्यायाम, लेखन इत्यादी व्यक्तिमत्त्व विकासाभिमुख उपक्रमांत गुंतून भविष्य सुखकर करून घेण्यासाठी पर्यत्नशील राहायला पाहिजे असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद कुंभार यांनी मार्गदर्शन करताना केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.अलिशा मोरे हिने केले. प्रा. कु. प्राजक्ता शिंदे यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वरिष्ठ लिपिक अमोल खरात व सौ. आशा खंडागळे यांनी विशेष परिश्रम घेतले या वेळी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण करून घेऊन त्या वृक्षांचे पुढील तीन वर्षे संगोपन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली.










