अकलूज चे जागृत ग्रामदैवत अकलाई देवी शारदीय नवरात्र महोत्सव चे 26सप्टेंबर पासून आयोजन.
अकलूज (प्रतिनिधी )अकलूज चे जागृत ग्रामदैवत श्री अकलाई देवस्थान, अकलूज. यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे,श्री अकलाई देवी शारदीय नवरात्र महोत्सव दि.२६/०९/२०२२ ते दि.०५/१०/२०२२ या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. सदर महोत्सवात “सर्व मंगल मांगल्ये | शिवे सर्वार्थ साधिके ।। शरण्ये त्र्यंबके गौरी | नारायणी नमोस्तुते ।। अकलाई नमोस्तुते । अकलाई नमोस्तुते II या महामंत्राचा नामजप करण्याचे आयोजन दुपारी ०४:०० ते सायं.०६:३० पर्यंत करण्यात आले आहे. सदर नामजपा साठी भाविक भक्तांनी, महिला भक्तांनी सहभागी होण्यासाठी त्वरीत आपली नावे श्री अकलाई मंदिर येथे नोंदवावीत. असे आवाहन श्री अकलाई देवी देवस्थान,अकलूज.चे कार्यकारी विश्वस्त जयसिंह (बाळदादा )शंकरराव मोहिते पाटील यांनी केले आहे.नामजप साठी सहभागी होणेसाठी संपर्क मो.नं. ९७६५०६३८४७, ८६६९०१४४७७ या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.श्री अकलाई देवी शारदीय नवरात्र महोत्सव चे आयोजन करण्यात आले असून,माहे आश्विन शके १९४४ दि26-09-2021.ते 09-10-2022 या कालावधीत शारदिय नवरात्र महोत्सव धार्मिक विधी होणार आहेत.आश्विन शु. ॥१॥ प्रतिपदा सोमवार २६/९/२०२२ पहाटे ५.१५ वा. श्रीं ची सिंहासन महापुजा व सकाळी ७.१५ वा. घटस्थापना महाआरती, नवरात्रारंभ आश्विन शु.!!2!!द्वितीया,मंगळवार २७/९/२०२२ श्रीं ची नित्योपचार अलंकार महापुजा आश्विन शु. ‘!!3!!तृतीया बुधवार २८/९/२०२२ श्रीं ची नित्योपचार अलंकार महापुजा, (सप्तरात्रोत्सवारंभ) आश्विन शु. ॥४॥ चतुर्थी गुरुवार २९/९/२०२२ श्री ची नित्योपचार अलंकार महापुजा,आश्विन शु. ।।५॥। पंचमी शुक्रवार ३०/९/२०२२, श्रीं ची नित्योपचार अलंकार महापुजा (ललितापंचमी, पंचरात्रोत्सवारंभ), आश्विन शु. ॥६॥। षष्टी शनिवार १/१०/२०२२ श्रीं ची नित्योपचार अलंकार महापुजा,आश्विन शु. ॥७॥। सप्तमी रविवार २/१०/२०२२ श्रीं ची नित्योपचार अलंकार महापुजा (त्रिरात्रोत्सवारंभ),आश्विन शु. ॥८॥। अष्टमी सोमवार ३/१०/२०२२ श्रीं ची नित्योपचार अलंकार महापुजा (एकरात्रोत्सवारंभ) (दुर्गाष्टमी-महाअष्टमी-उपवास) सायं. ६.४५ वा नव दुर्गाच्या नऊ ज्योतीचे प्रज्वलन व दिपमाळ प्रज्वलन. आश्विन शु. ।॥९॥। नवमी मंगळवार ४/१०/२०२२ श्रीं ची नित्योपचार अलंकार महापुजा (नवमी उपवास) (नवरात्रोत्थापन-पारणा-घट उठवणे) महानैवेद्य,आश्विन शु. ।॥१०1॥ दशमी बुधवार 4/90/2022 श्रीं ची नित्योपचार अलंकार महापुजा (विजया दशमी-दसरा) विजया दशमी-दसरा अश्वपुजा (विजयी मुहुर्त दु. २.२६ वा. ते दु. ३.१३ वा. पर्यंत) शमीपुजन-सार्वजनिक सिमोलंघ्यन, दु. ५.०० वा महाआरती व छबीना, रात्री 12वा . मंचकी निद्रा – तसेच दि. ५/१०/२०२२ रात्री १२.०० ते ८.१०.२०२२ अखेर पर्यंत श्रीं ची मंचकी निद्रेसाठी मंदीर वाढविणेत येईल. अश्विन शु. पौर्णिमा रविवार ९/१०/२०२२ श्रीं ची नित्योपचार अलंकार महापुजा पहाटे ५.०० वा., सायं. ७.०० वा. महाआरती व छबीना (कोजागिरी पोर्णिमा) कोजागिरी पौर्णिमा – रात्री १२.०० वा. दुधाचा नैवेद्य.असे कार्यक्रम होणार आहेत. तसेच दि. २६/९/२०२२ ते ५/१०/२०२२ दररोज पहाटे ५.०० वा. महाआरती व सायं. ७.०० वा. महाआरती व छबीना होणार आहे.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अकलाई देवीचे पुजारी मोहन गुरव आणि त्यांचे सहकारी परिश्रम घेत आहेत.या सर्व कार्यक्रमासाठी अकलूज आणि पंचक्रोशीतील भाविकांनी उपस्थित राहावे. असे आवाहन अकलाई देवी देवस्थान चे कार्यकारी विश्वस्त, जयसिंह (बाळदादा )मोहिते पाटील यांनी केले आहे.








