*अखिल भारतीय ग्राहक पंचायत अकलूज शहर अध्यक्ष पदी मा.श्री.लालासाहेब अडगळे यांची निवड*
आज शिवरत्न नाॕलेज सिटी येथे नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली असुन या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून धैर्यशील मोहिते पाटील उर्फ भैय्यासाहेब, सुभाष सरदेशमुख, प्रमुख वक्ते म्हणून दीपक इरकल व विनय उपाध्ये, सदानंद बडवे उपस्थित होते या प्रसंगी कार्यकारिणी पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आलीअध्यक्ष :- लालासाहेब अडगळे , उपाध्यक्ष;- गणेश पोटे वा संतोष ऐवळे .संघटक -नवनाथ वसव. सहसंघटक- महेश सूर्यवंशी. सचिव –भागवत शिंदे .सहसचिव– शैलेश दिवटे. कोषाध्यक्ष —विक्रम वैद्य .सहकोशाध्यक्ष– अभिजीत माने .प्रसिद्धी प्रमुख —तनवीर तांबोळी . कार्यकारणी सदस्य अमित पुंज , हितेश पुंज ,विनोद चौगुले, संभाजी माने, मुस्तफा अकबर काझी याप्रमाणे घोषणा करण्यात आली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सदानंद बडवे सर यांनी केले नवीन कार्यकारिणींला मार्गदर्शन करताना धैर्यशील मोहिते पाटील यांनी ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी ग्राहक संरक्षण कायदा व ग्राहक पंचायतीचे मोलाचे योगदान आहे व सर्वात जास्त महिला ग्राहकांची फसवणूक होते त्यासाठी या चळवळीमध्ये महिलांचाही सहभाग असावा यासाठी प्रयत्न करावेत असे ठळकपणे उल्लेख केले केला.सुभाष सरदेशमुख यांनी संघटना व संघटन या विषयावर मार्गदर्शन केले . दीपक इरकल सर यांनी ग्राहक संरक्षण कायदा बाबत मार्गदर्शन केले ग्राहक पंचायत माळशिरस तालुका अध्यक्ष , उपेंद्र केसकर यांनी ग्राहकपंचायतीची ऑनलाईन सदस्या नोंदणी लवकरात लवकर करून घ्यावी असे सर्वांना आवाहन केले या कार्यक्रमास इतर सर्व कार्यकर्ते उपस्थित होते








