अखिल भारतीय ग्राहक पंचायत अकलूज शहर ची नूतन कार्यकारणी जाहीर
अकलूज (प्रतिनिधी )10सप्टेंबर रोजी शिवरत्न नॉलेज सिटी या ठिकाणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत अकलूज नूतन कार्यकारणी ची घोषणा करण्यात आली.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील ,सुभाष सरदेशमुख, प्रमुख वक्ते म्हणून दीपक इरकल व विनय उपाध्ये, सदानंद बडवे उपस्थित होते.
यावेळी नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
अध्यक्ष :- लालासाहेब अडगळे,उपाध्यक्ष :- गणेश पोटे,उपाध्यक्ष:- संतोष ऐवळे,संघटक :- नवनाथ वसव,सह संघटक:- महेश सूर्यवंशी,सचिव :- भागवत शिंदे,सहसचिव :- शैलेश दिवटे,कोशाध्यक्ष :- विक्रम वैद्य,सहकोशाध्यक्ष :- अभिजीत माने,
प्रसिद्धी प्रमुख:- तनवीर तांबोळी,
कार्यकारणी सदस्य अमित पुंज , हितेश पुंज ,विनोद चौगुले, संभाजी माने, मुस्तफा अकबर काझी यांची निवड करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सदानंद बडवे सर यांनी केले.
नवीन कार्यकारिणींला मार्गदर्शन करताना धैर्यशील मोहिते पाटील यांनी ग्राहकांची फसवणूक होऊ नये.यासाठी ग्राहक संरक्षण कायदा व ग्राहक पंचायतीचे मोलाचे योगदान आहे व सर्वात जास्त महिला ग्राहकांची फसवणूक होते. त्यासाठी या चळवळीमध्ये महिलांचाही सहभाग असावा यासाठी प्रयत्न करावेत. असे आवर्जून सांगितले..
सुभाष सरदेशमुख यांनी संघटना व संघटन या विषयावर मार्गदर्शन केले.दीपक इरकल सर यांनी ग्राहक संरक्षण कायदा बाबत मार्गदर्शन केले. ग्राहक पंचायत माळशिरस तालुका अध्यक्ष उपेंद्र केसकर यांनी ग्राहकपंचायतीची ऑनलाईन सदस्य नोंदणी लवकरात लवकर करून घ्यावी असे सर्वांना आवाहन केले. या कार्यक्रमास इतर सर्व कार्यकर्ते उपस्थित होते







